37.4 C
Latur
Monday, May 20, 2024
HomeFeaturedडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या खटल्याचा उद्या निकाल

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या खटल्याचा उद्या निकाल

पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाचा निकाल उद्या (ता. १०) जाहीर करण्यात येणार आहे. या खटल्यात पाच आरोपींवर आरोप निश्चिती करण्यात आली असून हत्येनंतर १० वर्षांनी हे प्रकरण निकाली लागत आहे.

डॉ. दाभोलकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ ला सकाळी पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ओंकारेश्वर मंदिराजवळील शिंदे पुलावर सकाळी सव्वासातच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबवले व अगदी जवळून पिस्तुलाच्या गोळ्या त्यांच्यावर झाडल्या होत्या. त्यात त्यांचा जागेवर मृत्यू झाला होता. सुरुवातील पुणे पोलिस, त्यानंतर एसटीएस आणि अखेर केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने (सीबीआय) या सर्व हत्या प्रकरणांचा तपास केला.

या गुन्ह्यातील आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर १५ सप्टेंबर २०२१ ला आरोप निश्चित करण्यात आले. सुरुवातीला या खटल्याची सुनावणी वर्षभर जिल्हा न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरु होती. त्यानंतर न्यायाधीश नावंदर यांची बदली झाल्याने सध्या पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरु आहे. सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी या प्रकरणात २० साक्षीदार तपासले. बचाव पक्षाचे वकील प्रकाश साळंिसगीकर, अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अ‍ॅड. सुवर्णा आव्हाड यांनी काम पाहिले. त्यांनी दोन साक्षीदार न्यायालयात हजर केले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR