37.4 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeसोलापूरअल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी बापलेकाला ३ वर्षे सश्रम कारावास

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी बापलेकाला ३ वर्षे सश्रम कारावास

बार्शी: सालगडी म्हणून काम करीत असलेल्या कामगाराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून डोक्यात दगड घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बार्शी न्यायालयाचे न्या. जयेंद्र जगदाळे यांनी दोन आरोपींस दोषी धरून त्यांना विविध कलमांनुसार ३ वर्षे सश्रम कारावास व ३ लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

शिक्षा सुनावलेले रोहिदास दत्तात्रय घोडके (३५) व दत्तात्रय किसन घोडके (६०) हे बाप-लेक आहेत. ही घटना ७ जानेवारी २०१९ रोजी शेत मालकाच्या शेतात घडली होती. कुटुंबीयांसह शेतातच राहणारी पीडित मुलगी घटनेच्या दिवशी शौचास जाते, म्हणून सांगून गेली होती. बराच वेळ होऊनही ती परत न आल्याने आई तिचा शोध घेत असताना ती उसाच्या सरीत बेशुद्धावस्थेत पडलेली दिसली. अंगावरील कपडेही अर्धवट स्थितीत व तिच्या डोकीजवळ रक्ताने माखलेले दोन दगड दिसले. तिला ताबडतोब करमाळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करून तेथून सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे हलविण्यात आले.

बार्शी न्यायालयाने भादंवि ३७६ खाली जन्मठेप आणि प्रत्येकी ५० हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास १ वर्ष कारावास, पोक्सोखाली २० वर्षे कारावास
आणि पन्नास हजार रुपये दंड व तो न भरल्यास १ वर्ष सश्रम कारावास व कलम६ नुसार ३ वर्षे कारावास आणि ३ लाख रुपये देह व एकूण होणाऱ्या दंडाच्या रकमेतील १ लाख रुपये पीडितेस तीन महिन्यांत द्यावेत, असा आदेश दिला आहे. नेण्यात आले. करमाळा पोलिसात पोक्सो व इतर कलमांनुसार अज्ञात आरोपीविरुद्ध करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तपास करताना उपरोक्त आरोपींची माहिती मिळाली. मुलगी जिवंत राहिल्यास आपले नाव इतरांना सांगेल म्हणून तिच्या डोक्यात दगड व लोखंडी दांडा मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे आरोपींनी सांगितल्यावर त्यांच्यावर विविध
कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले. बार्शी न्यायालयात विविध कलमांनुसार दोषारोपपत्र दाखल केले असता सुनावणी होऊन शिक्षा सुनावण्यात आली. सुनावणीच्या वेळी सरकारच्या वतीने अ‍ॅड. प्रदीप बोचरे व अ‍ॅड. दिनेश देशमुख व अँड. राजश्री कदम यांनी तसेच कोर्ट पैरवी म्हणून नितीन ताकभाते व अतुल पाटील यांनी काम पाहिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR