36.5 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeराष्ट्रीयपैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही

पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही

काँग्रेसच्या महिला उमेदवाराने परत केले तिकीट

पुरी : राजकारणात एखाद्या निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त स्पर्धा बघायला मिळते. मात्र, ओडिशातील पुरी येथील काँग्रेसच्या उमेदवार सुचारिता मोहंती यांनी तिकीट मिळूनही लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. निवडणूक लढवण्यासाठी पक्षाकडून फंड मिळाला नसल्याचे सुचारिता यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर, हे स्पष्ट आहे की, केवळ निधीची कमतरताच आम्हाला पुरीमध्ये विजयी अभियानापासून रोखत आहे. पक्षाच्या निधीशिवाय पुरीमध्ये प्रचार करणे शक्य होणार नाही, याचे मला दु:ख आहे. त्यामुळे मी पुरी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे तिकीट परत करत आहे असे सुचारिता यांनी म्हटले आहे.

खरे तर, सुचरिता मोहंती यांनी आपला राजीनामा लिहून पाठवला आहे. यात त्यांनी लिहिले आहे, “मी काँग्रेसची महिला आहे आणि काँग्रेसची मूळ मूल्ये माझ्या डीएनएमध्ये आहेत. मी काँग्रेस आणि माझे नेते जननायक राहुल गांधी यांचा एकनिष्ठ सैनिक राहीन. पुरी लोकसभा जागेसाठी उमेदवारी दिल्यानंतर मोहंती यांनी क्राउड फंडिंगद्वारे निधीची व्यवस्था करण्याचाही प्रयत्न केला. निवडणूकीसाठी देणगी मागत त्यांनी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर यूपीआय क्यूआर कोड आणि खात्याचा तपशीलही शेअर केला होते.

यापूर्वी, मोहंती यांनी २०१४ मध्ये पुरी लोकसभा मतदारसंघातून सार्वत्रिक निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना बीजेडीचे उमेदवार पिनाकी मिश्रा यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा पुरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर सत्ताधारी बीजेडीने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त अरुप पटनायक यांना येथून उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे माजी खासदार ब्रजमोहन मोहंती यांची मुलगी सुचारिता यांनी शुक्रवारी काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांना हे पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी दावा केला आहे की, पक्षाने आर्थिक मदत देण्यास नकार दिल्याने, पुरी लोकसभा मतदारसंघात आपल्या प्रचारावर वाईट परिणाम झाला आहे. तसेच, काँग्रेसचे ओडिशा प्रभारी अजॉय कुमार यांनी आपल्याला स्वबळावर निवडणूक लढवण्यास सांगितले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR