22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमनोरंजन‘डंकी’ तोडू शकला नाही ‘जवान’चा रेकॉर्ड

‘डंकी’ तोडू शकला नाही ‘जवान’चा रेकॉर्ड

मुंबई : राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ चित्रपटाचे आज दुस-या दिवशीचे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले. शाहरूख खानचा या वर्षातील हा तिसरा चित्रपट आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने ३० कोटी रुपयांची कमाई केली होती.

हा चित्रपट ‘पठाण’ आणि ‘जवान’चे रेकॉर्ड तोडू शकला नाही. ‘डंकी’ने पहिल्या दिवशी ३० कोटींची कमाई केली होती. ‘डंकी’चा क्लॅश दुस-याच दिवशी प्रभासच्या ‘सालार’शी झाला.

२०२३ च्या सुरुवातीला ‘पठाण’ सुपर-डुपर हिट ठरला होता आणि नंतर ‘जवान’ सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. डंकीची दुस-या दिवशीची कमाई ठिकठाक राहिली.
‘डंकी’ने रिलीजच्या दुस-या दिवशी जवळपास २० कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. आता दोन दिवसांचे एकूण कलेक्शन ४९.२० कोटी रुपये झाले आहे. वर्ल्डवाईड कमाई ५८ कोटी रुपये आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR