28.8 C
Latur
Sunday, March 3, 2024
Homeराष्ट्रीयविवेक बिंद्रावर पत्नीला मारहाणीचा आरोप; गुन्हा दाखल

विवेक बिंद्रावर पत्नीला मारहाणीचा आरोप; गुन्हा दाखल

नवी दिल्ली : मोटिव्हेशल स्पीकर आणि युट्यूबर विवेक बिंद्रा सध्या चर्चेत आहे. त्याच्या पत्नीने त्याच्यावर मारहाणीचा आरोप केला आहे. विवेक बिंद्राविरोधात नोएडामधील सेक्टर-१२६ पोलिस ठाण्यात पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेक बिंद्रा आणि यानिका (विवेक बिंद्राची पत्नी) या महिन्यात ६ डिसेंबरला विवाहबद्ध झाले. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे ७ डिसेंबरला सकाळी बिंद्रा आणि त्याची आई प्रभा यांच्यात जोरदार वाद झाला.

यानिका मध्यस्थी करण्यासाठी पुढे आली असता बिंद्राने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात यानिकाला दुखापत झाल्याची माहिती आहे. यानिकावर दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विवेक बिंद्राविरुद्ध त्याची पत्नी यानिकाचा भाऊ वैभव याने १४ डिसेंबरला तक्रार दाखल केली होती. मात्र नोएडा पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तातडीने कोणतीही कारवाई केली नाही आणि आता आरोपी विवेक बिंद्रा फरार झाला आहे. त्याचा शोध सुरू आहे.

कानाचा पडदाही फाटला
एफआयआरनुसार, बिंद्राने कथितरित्या यानिकाला एका खोलीत नेले, तिचे केस ओढले आणि तिच्यावर हल्ला केला. बिंद्राने तिचा फोनही तोडला. यानिकाला मारहाण करताना तिच्या कानाचा पडदाही फाटला, असा आरोप आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR