मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल मंत्रालयातील अधिकारी-कर्मचा-यांच्या वतीने मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित शोकसभेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सेवाकाळात नेहमी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कर्तव्य भावनेने शासकीय कर्तव्य पार पाडले. त्यांच्या निधनाने राज्य शासनाने एक कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि वक्तशीर नेतृत्व गमावले आहे, अशी भावना अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी उपस्थितांच्या वतीने या वेळी व्यक्त केली.
या प्रसंगी मंत्रालयातील सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. या वेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात येऊन त्यांना हे दु:ख सहन करण्याचे बळ लाभो, अशी प्रार्थना करण्यात आली.

