निलंबन विरोधात कर्मचा-यांचे कामबंद आंदोलन

परभणी : येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचा-यांनी शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजल्यापासून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनामुळे रुग्णालयातील कामकाज ठप्प झाले होते. दरम्यान शिवसेना नेते आनंद भरोसे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले आहे.

जिंतूर येथील गर्भवती मातेसह बाळाच्या मृत्यू प्रकरणात हलगर्जीपणाचा ठपका ठेवत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लखमावार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचा-यांत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. संतप्त कर्मचा-यांनी निलंबन मागे घेण्याच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेत शुक्रवारी सकाळ पासून कामबंद आंदोलन सुरू केले. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सारिका बडे, नानलपेठ पोलिस निरीक्षक गणेश कदम, शिवसेना नेते आनंद भरोसे यांच्यासह संबंधितांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कर्मचा-यांशी चर्चा केली. शिवसेना नेते भरोसे यांनी दि. १८ ऑगस्टपर्यंत मंत्री महोदयांशी चर्चा करून डॉ. लखमावार यांचे निलंबन रद्द करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर कर्मचा-यांनी ४ तासांनंतर कामबंद आंदोलन मागे घेतले. आता दि. १८ ऑगस्टपर्यंत निलंबनाबाबत काय निर्णय होतो. याकडे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचा-यांचे लक्ष लागले आहे.

अधिष्ठातांची ३ तासानंतर आंदोलकांशी भेट
आंदोलन सुरू असताना अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सारिका बडे व कर्मचा-यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता रविंद्र चव्हाण यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने जिल्हा रुग्णालयात येण्याची फोनद्वारे विनंती केली. परंतू तब्बल ३ तासानंतर ते रुग्णालयात दाखल झाल्याचा आरोप कर्मचा-यांनी केला आहे. रुग्णालयात आल्यानंतरही अधिष्ठात्यांकडून आंदोलनकर्त्या कर्मचा-यांना कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नसल्याने कर्मचा-यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरच्या उदगीरमध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको! हेक्टरी 1 लाख नुकसानभरपाईची मागणी
02:50
Video thumbnail
Latur Ground Report|लातूरचा रिंग रोड खड्ड्यात! वाहनधारकांची जीवघेणी कसरत
03:25
Video thumbnail
विठ्ठल कांगणे सर फडणवीसांच्या भेटीला गेले अन् विद्यार्थी नाराज! रमेश पाटील यांचा थेट फोन
02:23
Video thumbnail
Latur|पावसासाठी हजारो मुस्लिम बांधवांचं अल्लाहकडे साकडं! लातूरच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज
05:52
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
01:12:21
Video thumbnail
Gunratan Sadavarte LIVE : सदावर्ते जरांगेंना रोखणार? ‘चलो मुंबई’च्या घोषणेनंतर काय म्हणाले?
00:00
Video thumbnail
Nanded|DJ बंदीवर गौतमी पाटीलची ‘नो कमेंट’! टीकाकारांवरही मौन
02:20
Video thumbnail
Latur|विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक बाप्पा! लाहोटी शाळेचा अनोखा उपक्रम
02:34
Video thumbnail
Latur|पक्ष बाजूला ठेवा,संकटातून मार्ग काढू!लातूरच्या दुष्काळावर संभाजी पाटील निलंगेकरांचा मोठा प्लॅन
04:53
Video thumbnail
Latur|MPSC विद्यार्थ्यांच्या मोर्चात रोहित पवार! ‘अध्यक्ष-सचिवांनी राजीनामा दिलाच पाहिजे’
01:58
Video thumbnail
MPSC STUDENT PROTEST|MPSC विद्यार्थ्यांचा लातुरात आक्रोश;पेपरफुटी विरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर
03:44
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
10:07
Video thumbnail
Sanjay Raut On Manoj jarange|जरांगेंच्या उपोषणावर राऊत संतापले; सरकारला सुनावलं!
12:37
Video thumbnail
Dharashiv|उमरगा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा! शेतकऱ्यांचा सरकारला इशारा
02:40
Video thumbnail
Latur|लातूर ते कोकण थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी! गणेशोत्सवात प्रवाशांची मोठी सोय
03:46

Latest news