22.3 C
Latur
Friday, August 1, 2025
Homeमहाराष्ट्रछत्तीसगडमध्ये चकमक, प्रमुख नक्षलवादी ठार

छत्तीसगडमध्ये चकमक, प्रमुख नक्षलवादी ठार

नक्षल्यावर ८ लाखांचे होते बक्षीस

बिजापूर : प्रतिनिधी
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत डेप्युटी कमांडर आणि स्रायपर सोधी कन्ना हा मारला गेला. त्याला पकडण्यासाठी ८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्याचा मृतदेह आणि ३०३ रायफल जप्त करण्यात आली आहे. याबाबतची माहिती बिजापूरचे पोलिस अधीक्षक जितेंद्र यादव यांनी दिली.

जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान परिसरात माओवादी कार्यकर्त्यांच्या हालचालींबद्दल माहिती मिळाली होती. त्यावरून डीआरजी बिजापूर, डीआरजी दंतेवाडा, एसटीएफ, कोब्रा २०२, कोब्रा २१० आणि सीआरपीएफ यांचे संयुक्त पथक ४ जुलैपासून शोध मोहिमेवर पाठवण्यात आले होते. या कारवाईदरम्यान सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये अधूनमधून चकमकी होत होत्या. चकमकीनंतर शोध मोहिमेदरम्यान सोधी कन्नाचा मृतदेह आणि शस्त्रे जप्त करण्यात आली.
गेल्या १८ महिन्यांत आतापर्यंत ४१५ कट्टर माओवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. हे सुरक्षा दलांच्या कार्यक्षम नियोजन आणि धाडसी कारवाईचा पुरावा आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

रायफल्स, काडतुसे जप्त
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात ज्या ठिकाणी चकमक झाली, त्या ठिकाणावरून ३०३ रायफल आणि ५ जिवंत काडतुसे, एके-४७ मॅगझिन आणि ५९ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. याशिवाय नक्षलवादी साहित्य, रेडिओ आणि दैनंदिन वापराच्या वस्तूही ताब्यात घेण्यात आल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR