लातूर : प्रतिनिधी
पुन्हा वाटे तरुण व्हावे, हातामध्ये दप्तर घ्यावे, पुन्हा वाटे काँलेजात जावे, अन्न जगण्याचे सोने व्हावे, पुन्हा वाटे पुस्तक घ्यावे, प्रत्येक पान वाचीत जावे, मित्रांच्या सहवासात जगण्याचेही सोने व्हावे, अशा आशयाचे भाव पंधरा वर्षानंतर एकत्र भेटलेल्या यमुनाबाई गोरे अध्यापक विद्यालयाल मुरुड येथील २००५ ते २००८ या वर्षात शिकणा-या माजी विद्यार्थ्यांच्या चेह-यावर दिसत होते. तब्बल पंधरा वर्षा नंतर हे माजी विद्यार्थी एकमेकांना भेटले. आपल्या काँलेज जिवणातील अनेक कडु-गोड आठवणीला यावेळी त्यांनी उजाळा दिला.
यमुनाबाई गोरे अध्यापक विद्यालयातील माजी विद्यार्थीचा स्रेंह मेळावा मुरुड येथे सामाजिक कार्यकर्ते अनिल पुरी यांच्या पुढाकारातून नुकताच आयोजित करण्यात आला होता. त्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पंधरा वर्षापुर्वी प्रमानेच सकाळी दहा वाजता डिएड काँलेज भरले. मग प्रार्थना, परीपाट झाले. विद्यार्थी रांगेत वर्गात गेले. प्राध्यापकांनी हजेरी घेतले. आपण ज्या वर्गात शिकलो ज्या बाकडयावर बसलो, त्याच ठिकाणी बसुन या विद्यार्थीनी पंधरा वर्षा पुर्वीचे क्षण अनुभवले.आपल्याला शिकवलेल्या प्राध्यापकांचा सन्मान करुन सर्वच विद्यार्थीनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पंधरा वर्षानंतरही मैत्रीतील गोडवा कायम होता.
यावेळी प्राचार्य कैलास मोठे, प्रा. गिरीश रंदाळे, प्रा. महादेव बरुरे, प्रा. पंडीत महामुनी, प्रा. निता समुद्रे, प्रा. बजाज, प्रा. काळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते अनिल पुरी, सचिन लाटे, महेद्र मुरकुटे, वनिता ओनामे, अंजली लोहारकर, सिमा शिंदे, अमोल गोरे, महेश दांगट. रोहिणी नाडे, अमोल खोचरे, शितल विभूते, श्रीहरी गाढवे, राहुल शिंदे, सारीका नरवडे, प्रकाश जाधव, शिला धावारे, अनिता सरवदे, सत्यभामा पाटील, मिरा अंबुरे, संजय भंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अनिल पुरी यांनी केले तर आभार रोहिणी नाडे यांनी मांडले.