29.8 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeलातूर१० रुपयाचे नाणे न स्विकारणारे कारवाईस पात्र

१० रुपयाचे नाणे न स्विकारणारे कारवाईस पात्र

लातूर : प्रतिनिधी
१० रुपयांचे नाणे चलणात आहे. या नाण्यावर कोणत्याही प्रकाची बंदी नाही. आरबीआयच्या नियमाप्रमाणे प्रचलीत असलेले नाणे न स्विकारणे हा गुन्हा आहे. त्यामुळे १० रुपयांचे नाणे स्विकारण्यास नकार देणारे व्यक्ती कारवाईस पात्र राहातील, याची नोंद घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर यांनी दिले असून याबाबत सर्व बँकांनी जनजागृती करावी, अशी सूचनाही जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांच्या शाधाधिका-यांना दिलेल्या पत्रात नमुद केले आहे.

लातूर जिल्ह्यात दहा रुपयाचे नाणे स्वीकारण्यास सर्वत्र नकार मिळत असून, हा राजमुद्रेचा अवमान आहे. बँकांनी व प्रशासनाने याकडे डोळेझाक केली, त्यामुळे नागरिकांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. दहा रुपयाचे नाणे स्थानिक तथा परिसरात सर्वत्र स्वीकारण्यास चक्क नकार मिळत असून त्यामुळे सदर नाणी बंद झाल्याची अफवा पसरली आहे. आता नागरिकही हे नाणे एकमेकांकडून स्वीकारत नसल्याने नाणे चलनातून बाद झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

दहा रुपयाचे नाणे चलनात असून ते सर्व दुकानदारांनी व ग्राहकांनी स्वीकारावे, अशा सूचनांचे फलक सर्व बँकांनी व पतसंस्थांनी आपापल्या बँकेत लावल्यास ग्राहकांमधील गैरसमज दूर होईल, असे मत काहींनी व्यक्त्त केले आहे. दहा रुपयाची नाणी हे रिझर्व बँकेने जारी केलेले कायदेशीर टेंडर आहे आणि ते स्वीकारण्यास नकार देणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. वीस रुपयाची नाणी चलनात आहे, ते मात्र व्यवहारात स्वीकारले जात आहेत.मात्र काही दिवसांनी या नाण्याची हीच गत होण्याची शक्यता बाळगून आतापासूनच हे नाणे घेण्याचे टाळले जात आहे, त्यामुळेचिंता निर्माण झाली आहे. दहा रुपयाचे नाणे हे चलनात असून याबाबत प्रशासनाने वृत्तपत्रातून वारंवार खुलासा दिला आहे. ग्राहकांनी ते घ्यावे, असे आवाहनही केले आहे.

दहा रुपयांच्या नाण्यांच्या वापराबाबतचा गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी. त्यासाठी बँक शाखेच्या बाहेर बॅनर, लिफलेट, फिरत्या वाहनावरुन जनजागृती, बँकांच्या ग्रामीण भागातील यंत्रणांचा पुरेपूर वापर करुन नागरिकांपर्यंत हा संदेश पोचवावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांनी सर्व बँकांच्या शाखाधिका-यांना पत्राद्वारे केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR