पुणे : प्रतिनिधी
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पुण्यात मराठा समाजाच्या वतीने सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद पाहायला मिळाला. यावेळी धस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येची सुरुवात एप्रिल-मेदरम्यान झाल्याचे सांगत मंत्री धनंजय मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर खंडणी वसूल करण्याची बैठक झाल्याचा खळबळजनक दावा केला. एवढेच नव्हे, तर हे जर खोटे निघाले तर राजकारण सोडेन, असे आव्हानही त्यांनी दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना तुमच्या पाया पडतो. तुम्ही धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हटवा, अशी मागणीही त्यांनी केली.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यात आयोजित केलेल्या सर्वपक्षीय मोर्चात आमदार धस बोलत होते. यावेळी त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येची सुरुवात एप्रिल-मे महिन्यापासून झाली. आमच्याकडे कंपन्या येऊ लागल्या. नितीन बिक्कड याने स्वत:च्या पायाला गोळी मारून घेतली. कंपनीवर गुन्हा दाखल केला आणि हे प्रकरण कोर्टापर्यंत गेले. पुढे हे सिद्ध झाले तरी कंपनीवाले म्हटले मिटवून टाका. तिथून पुढे बिक्कडचा परभणी आणि धाराशिव जिल्ह्यात वावर वाढला. कंपन्यांच्या सिक्युरिटीचे काम घेऊ लागला.
यादरम्यान त्याची वाल्मिक कराडसोबत भेट झाली. वालूबाबा, आकाची मीटिंग झाली. १९ जूनला वाल्मिक कराड, नितीन बिक्कड, अनंत काळकुटे, आवादा कंपनीचे अधिकारी शुक्ला यांची परळीमधील धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाली. आवादा कंपनीच्या शुक्ला यांना घेऊन नितीन बिक्कड परळीला वाल्मिक कराडकडे गेला. कंपनीवाले धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी प्रयत्न केले, ही बाब कराडला समजली. कराड हे मुंडे यांचे पीए देशमुख यांना काय म्हणायचे ते म्हणल्याचे धस यांनी सांगितले.
आय कंपनीची मीटिंग मुंबईला धनंजय मुंडे यांच्यासोबत ठरली. धनंजय मुंडे यांच्या सातपुडा बंगल्यावर आवादा कंपनीचे अधिकारी अल्ताफ तांबोळी, शुक्ला यांची वाल्मिक आणि नितीनची बैठक झाली. यावेळी तीन कोटीची डील झाली. आका बोलले ३ कोटी द्या, यावेळी कंपनीचे अधिकारी बाहेर पडले आणि कंपनीच्या वरिष्ठांना सांगितले. मात्र, वरिष्ठांनी त्यांना २ कोटीमध्ये फायनल करा, असे सांगितले. अधिकारी त्यांना बोलले की २ कोटी त्यावेळी जाताना ते म्हटले की पुढे ठरवू. पण निवडणुकीच्या काळात ५० लाख आकानी घेतले की बड्या आकाने घेतले मला माहित नाही. सरकारी बंगल्यावर खंडणीसाठी बैठका झाल्याचे म्हणत सुरेश धस यांनी गंभीर आरोप केला.
कराडच्या बँक खात्यांची ईडीमार्फत चौकशी करा
वालूकाकाचे चालूबाबा एसआयटीत सामील झाले. केज पोलिस स्टेशन अंतर्गत काम करणारे कर्मचारी आहेत. त्या कर्मचा-यांना सीआयडीने यादी मागितल्यावर ती यादी सीआयडीने गृहखात्याकडे पाठवली. वालूबाबाला आकांचा आशीर्वाद असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. वाल्मिक कराडचे १०० अकाऊंट सापडले, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना स्पेशल विनंती की यांची चौकशी ईडीकडे जावी, असे आमदार धस म्हणाले.
कराडकडे १७ सीम कार्ड
वाल्मिक कराड आणि त्याचा सहकारी नितीन कुलकर्णी हे १७ मोबाईल नंबर वापरतात. कराड शरण आल्यापासून नितीन कुलकर्णी फरार आहे. पण माझी बीडच्या पोलिस अधीक्षकांना आणि सीआयडीच्या डीजींना विनंती आहे की, या नितीन कुलकर्णीला ताब्यात घ्या. कोणा-कोणाकडून किती पैसे घेतले, ते तुम्हाला या १७ मोबाईल नंबरच्या तपासणीत सापडेल, असेही आमदार सुरेश धस म्हणाले.