23.2 C
Latur
Tuesday, July 16, 2024
Homeमहाराष्ट्रफडणवीस तुम्ही चर्चेला या, मराठे तुम्हाला अडवणार नाहीत : जरांगे पाटील

फडणवीस तुम्ही चर्चेला या, मराठे तुम्हाला अडवणार नाहीत : जरांगे पाटील

जालना : सर्वपक्षीय बैठकीनंतर सरकारने आपल्याकडे वेळ मागितला आहे. मी उपोणषाला बसून ७-८ दिवस झाले. सरकार आता सांगत आहेत की त्यांना वेळ हवा आहे. कशासाठी आणि किती वेळ हवाय? हे सरकारने सांगावं. मग मी समाजाशी बोलून वेळ द्यायचा की नाही ते ठरवेन. पण वेळ दिला तर सरकार आरक्षण देणार आहे का? असा उलटसवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला. त्याचवेळी आम्ही चर्चेला चार दिवसांपासून बोलवत आहोत, पण ते येत नाहीत. पण यांना काड्या घालायची सवय लागली आहे. त्यांना जे काही म्हणणं मांडायचे आहे त्यांनी इथे येऊन मांडावे, असे जरांगे पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हणाले.

मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी आज (१ नोव्हेंबर) सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला सर्वपक्षीय नेत्यांनी, आमदारांनी उपस्थिती लावली. राज्य सरकार कायद्याच्या पातळीवर टिकेल, अशाच गोष्टी करेल. राजकारण कोणालाही करायचं नाही.

आपण सगळे याबाबत सहकार्य करतच आहोत. पण यापुढे आपल्यातील काही नेत्यांनी आंदोलन करण्यापेक्षा सरकारची बाजूही समजून घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वपक्षीय नेत्यांना केलं. त्याचवेळी आंदोलकांनी आंदोलन करण्यापेक्षा सरकारची बाजू समजून घ्यावी, अशी विनंती देखील फडणवीस यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR