37.4 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeराष्ट्रीयफेसबुक लाईव्ह करीत भाजप नेत्याच्या मुलाकडून बोगस मतदान

फेसबुक लाईव्ह करीत भाजप नेत्याच्या मुलाकडून बोगस मतदान

अहमदाबाद : देशात तिस-या टप्प्यातील निवडणुकांसाठी मंगळवार ७ मे रोजी मतदान पार पडले. महाराष्ट्रातील ११ जागांवरील उमेदवारांसाठी मतदान घेण्यात आले. त्यामध्ये, बारामती, माढा, रत्नागिरी-सिंधुदुर्गसह विविध मतदारसंघात उत्साहात आणि उत्स्फूर्त मतदान झाले. मात्र, काही ठिकाणी मतदानाच्या घटनेला गालबोट लागण्याचे काम झाले.

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे चक्क ईव्हीएम मशिन पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. दुसरीकडे गुजरातच्या दाहोद लोकसभा मतदारसंघात भाजपा सदस्यांना अटक करण्यात आली आहे. बोगस मतदान केल्याचा आरोप ठेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे या घटनेतील आरोपींनी मतदान केंद्रावरच लाईव्ह स्ट्रीमींगही केले होते. सोशल मीडियावर या घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे.

काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली असून आरोपींनी २५ मतदान केंद्रांचा दौरा केला होता, यावेळी संतरामपूरमधील गोबिथ येथे बोगस मतदान केले. विशेष म्हणजे यातील एक आरोपी विजय भाभोरने या संपूर्ण घटनेचे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून व्हीडीओ रेकॉर्डींगही केले होते. त्यामध्ये, भाभोर हा एक बुधवरील मतदान केंद्रात एंट्री करतो, त्यानंतर ईव्हीएम मशिनसोबत छेडछाड करताना दिसून येतो. तर, निवडणूक अधिका-यालाही दमदाटी करताना आरोपी लाईव्हमध्ये दिसून येत आहे.

आम्हाला केवळ १० मिनिटे द्या, आम्ही इथेच बसून आहोत. ही ईव्हीएम मशिन माझ्या वडिलांची आहे, असे म्हणत आरोप भाभोर हा इतरही सहका-यांना कमळाचे बटण दाबण्याचा आग्रह करतो. या क्षेत्रात आपला दबदबा असल्याचे सांगत ईव्हीम मशिनसोबत नाचताना आरोपी भाभोर दिसून येतो. दरम्यान, या घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR