28.5 C
Latur
Tuesday, May 28, 2024
Homeराष्ट्रीयपडत झडत ममता

पडत झडत ममता

कोलकता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दुर्गापूरमध्ये हेलिकॉप्टरमध्ये बसत असताना तोल जाऊन कोसळल्याने त्यांना दुखापत झाली. पश्चिम वर्धमान जिल्ह्यात दुर्गापूर येथे आज दुपारी ही घटना घडली. ममता या हेलिकॉप्टरने कुल्टी येथील सभेसाठी चालल्या होत्या. सुदैवाने ममतादीदींना फारशी दुखापत न झाल्याने त्या पुढील प्रचारासाठी रवाना झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या घटनेनंतरही त्यांनी आसनसोलमधील पक्षाचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. हेलिकॉप्टरमध्ये पडताच त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना तातडीने उठण्यासाठी मदत केली. दरम्यान गत दोन वर्षांपासून ममता बॅनर्जी सातत्याने पडतायेत. त्या मुद्याम पडतात की खरच त्यांच्यासोबत असे छोटे मोठे अपघात घडत आहे. हे देवच जाणो… मात्र यामुळे त्यांना थोडी का होईना पण सहानुभुती मिळत आहे. ऐन निवडणुकीच्य काळात त्यांच्यावर असे पडण्याचे संकट ओढावते हे विशेष आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR