29.2 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeराष्ट्रीयतिस-या टप्प्यात १८% कलंकित तर २९% कोट्यधीश उमेदवार

तिस-या टप्प्यात १८% कलंकित तर २९% कोट्यधीश उमेदवार

९५ जागांसाठी १३५२ उमेदवार रिंगणात एडीआर अहवालातून माहिती समोर

नवी दिल्ली : येत्या ७ मे रोजी मतदान होणा-या तिस-या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी १२ राज्यांतील ९५ जागांसाठी १३५२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी २४४ (१८%) उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत, तर ३९२ (२९%) उमेदवार कोट्यधीश असल्याचे असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) अहवालातून पुढे आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यासाठी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २२ एप्रिल रोजी संपली असून, ७ मे रोजी होणा-या मतदानासाठी १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १,३५२ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये मध्य प्रदेशातील बैतुल संसदीय जागेसाठी आठ उमेदवारांचा समावेश आहे. ज्यासाठी मतदान आधी स्थगित करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यात ९४ जागांसाठी मतदान होणार आहे.

गुजरातमधील सुरत मतदारसंघातून एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. तिस-या टप्प्यात राज्यातील सर्व २६ लोकसभेच्या जागांसाठी ७ मे रोजी मतदान होणार होते, तथापि, सुरतच्या जागेवर वॉकओव्हर झाल्यामुळे, वर नमूद केलेल्या तारखेला मतदान होणा-या राज्यातील जागांची संख्या आता २५ झाली आहे. बैतूल लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दुस-या टप्प्यात २६ एप्रिल रोजी मतदान होणार होते, मात्र ९ एप्रिल रोजी बसपा उमेदवार अशोक भलावी यांचे निधन झाल्याने तेथील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या.

महाराष्ट्रत ११ जागांसाठी ७ मे रोजी होणार मतदान
गुजरातमध्ये सर्व २६ लोकसभा मतदारसंघांतून सर्वाधिक ६५८ उमेदवारी अर्ज आले आहेत, त्यानंतर महाराष्ट्रात ११ जागांसाठी ५१९ उमेदवारी अर्ज आले आहेत.

सर्वांत श्रीमंत उमेदवार कुठे?
राज्य एकूण कोट्यधीश
गुजरात २६६ ६८
महाराष्ट्र २५८ ७१
कर्नाटक २२७ ६९
छत्तीसगड १६८ ३७
मध्य प्रदेश १२७ ३७

सर्वाधिक संपत्ती असलेले उमेदवार
उमेदवार मतदारसंघ (राज्य) पक्ष चल संपत्ती अचल संपत्ती एकूण संपत्ती
पल्लवी श्रीनिवास डेंपे दक्षिण गोवा (गोवा) भाजप १,२५० कोटी १११ कोटी १३६१.६८ कोटी
ज्योतिरादित्य शिंदे गुणा (मध्य प्रदेश) भाजप ६२.५७ कोटी ३६२.१७ कोटी ४२४.७४ कोटी
छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर (महाराष्ट्र) कॉंग्रेस १६५.७७ कोटी १७७.०९ कोटी ३४२.८६ कोटी

सर्वांत कमी संपत्ती असलेले उमेदवार
उमेदवार मतदारसंघ (राज्य) पक्ष चल संपत्ती अचल संपत्ती एकूण संपत्ती
इरफान अबुतालिब चंद कोल्हापूर (महाराष्ट्र) अपक्ष
१०० रुपये ० १०० रुपये
रेखाबेन चौधरी बार्डोली (गुजरात) बसपा
२,००० रुपये ० २,००० रुपये
मनोहर प्रदीप सातपुते हातकणंगले (महाराष्ट्र) अपक्ष
२,००० रुपये ० २,००० रुपये

उमेदवारांची शैक्षणिक पार्श्वभूमी काय?
अशिक्षित १९
शिक्षित ५६
५ वी पास ७१
८ वी पास १३१
१० वी पास २०६
१२ वी पास २३१
डिप्लोमा ४४
पदवीधर २१९
व्या. पदवीधर १४३
पदव्युत्तर पदवी २०८
पीएच. डी. २१
डिप्लोमा ४४

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR