लखनौ : ज्येष्ठ साहित्यिक सेरा यात्री (सेवाराम यात्री) यांचे शुक्रवारी निधन झाले. वयाच्या ९१ व्या वर्षी गाझियाबाद येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सेरा यात्री यांनी ३२ कादंबऱ्या आणि ३०० हून अधिक कथा लिहिल्या. याशिवाय त्यांनी इतर शैलींमध्येही काम सुरू ठेवले. ते मागील काही काळापासून आजारी होते.
सेरा यात्रीचा जन्म १० जुलै १९३२ रोजी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील जदौदा गावात झाला. साप्ताहिक हिंदुस्थान, धर्मयुग, ज्ञानोदय, कादंबिनी, सारिका, साहित्य अमृत, साहित्य भारती, अनेकवचन, नवीन कथा, कहानी, पहला, श्रीवर्ष, शुक्रवार, नई दुनिया या देशातील सर्व वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमध्ये त्यांनी गेल्या ५० वर्षांत अखंड लेखन केले.