38.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूरएका दिवसात ३९०० मे. टन ऊच्चांकी गाळप

एका दिवसात ३९०० मे. टन ऊच्चांकी गाळप

लातूर : प्रतिनिधी
विलास सहकारी साखर कारखाना लि., युनीट-२ तोंडार ता. उदगीर येथील साखर कारखान्याने एकदिवसात ३ हजार ९०० मे. टन ऊसाचे ऊच्चांकी गाळप करुन ४ हजार ३०० क्विंटल साखर उत्पादनाचा विक्रम केला आहे. या हंगामाच्या सुरुवातीपासूनच ऊसतोडणी यंत्रणेचा आणि गाळपासाठी तांत्रीक कार्यक्षमतेने पूर्ण वापर करुन गाळप केले जात आहे, यामुळे साखर ऊतारा देखील चांगला मिळत आहे.

मांजरा परिवारातील विलास सहकारी साखर कारखाना लि., युनीट-२ च्या माध्यमातून उदगीर, जळकोट, देवणी या भागातील शेतक-यांच्या उसाचे गाळप वेळेवर होत आहे. या कारखान्याकडून ऊसउत्पादकांच्या ऊसाला चांगला ऊसदर देण्यात येत आहे. यामुळे तेथील शेतक-यांचे जीवन बदलत आहे. या हंगामात विलास सहकारी साखर कारखाना लि., युनीट-२ ने विक्रमी गाळप आणि साखर ऊत्पादन केल्या बद्दल सर्वांचे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी अभिनंदन करुन हंगामाच्या पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

विकासरत्न विलासराव देशमुख यांची प्रेरणा, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे मार्गदर्शन, संस्थापक चेअरमन माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामिणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांचे नेतृत्वाखाली विलास सहकारी साखर कारखाना युनीट-२ यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. गळीत हंगामाच्या सुरुवातीलाच ऊस गाळप आणि साखर उत्पादनात विक्रम केल्या बद्दल माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख व संस्थापक चेअरमन आमदार अमित विलासराव देशमुख व चेअरमन श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी ऊस उत्पादक शेतकरी, सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे आधिकारी, कर्मचारी वर्ग, वाहतूक ठेकेदार, तोडणी मंजूर व कंत्राटदार या सर्वांचे अभिनंदन केले आहे.

  • १२ दिवसात ५० हजार मे. टन ऊसाचे गाळप
    विलास साखर कारखाना युनीट-२ येथे गळीत हंगामाच्या १२ व्या दिवशी १६ नोव्हेबर रोजी एकदिवसात ३ हजार ९०० मे. टन ऊसाचे ऊच्चांकी गाळप करुन ४ हजार ३०० क्विंटल साखर उत्पादनाचा विक्रम झाला आहे. आज अखेर ५० हजार मे. टन ऊसाचे गाळप आणि ४७ हजार २२१ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून दैनदीन साखर ऊतारा १०.९० इतका आहे. तसेच गळीत हंगामात ऊसतोडणी वाहतूक यंत्रणा व तांत्रीक कार्यक्षमतेचा पूर्ण वापर केला जात आहे, पावसाची परिस्थिती पाहता हंगामात पाण्याची बचत करून पाण्याचा पूर्नवापर केला जात आहे, हंगामात कारखाना बंद राहणार नाही यांची काळजी घेतली जात आहे, अशी माहिती व्हाईस चेअरमन रविंद्र काळे व युनीट-२ चे कार्यकारी संचालक ए. आर. पवार यांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR