वलांडी : प्रतिनिधी
देवणी तालूक्यातील हिसामनगर येथे पाऊस सुरू असताना झाडाखाली थांबणे मजुराच्या जिवावर बेतले आहे. देवणी तालुक्यातील हिसामनगर (माटेगडी) येथे बुधवारी दुपारी ४;३० वाजेच्या सुमारास वीज पडून एका शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर तिघेजण जखमी झाले आहेत.
हिसामनगर येथील शेतमजूर संदीप केशव वाघमारे (वय ३५) हे शेती कामासाठी कल्याणराव मिरकले यांच्या शेतात गेले होते. बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास झालेल्या पावसात तिघेजण शेतातील झाडाखाली थांबले होते. यादरम्यान, वीज पडल्याने संदीप वाघमारे हा जागीच ठार झाला. तर अन्य तिघांना विजेची झळ बसल्याची माहिती सरपंच विजयकुमार मुके, पोलिस पाटील विलास पाटील यांनी दिली.
विजेची झळ बसलेले हिसामनगरचे कूमार वाघमारे,लक्ष्मीबाई येदले हे होते तर यांना दत्तू येदले यांना वलांडी येथील प्राथमिक उपचार केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी ऊदगीर येथे हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मंडळाधिकारी बालाजी केंद्रे व तलाठी यांनी घटनेचा पंचनामा केला. मयत संदीप वाघमारे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, असा परिवार असून त्यांच्या निधनाने हिसामनगर परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.