पंढरपूर : एककडे लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळी तर दुसरीकडे ऐन निवडणूकीत रासायनिक खतांच्या दरवाडीची जोरदार अफवा जिल्ह्यासह राज्यभर पसरली त्यामुळे शेतकऱ्यांतून सरकार विषयी गैरसमज पसरला यामुळे हैराण झालेल्या खत उद्योगाने दरवाढ झाली नसल्याचा स्पष्ट निर्वाळा दिला आहे. तर कोणत्याही रासायनिक खताच्या किंमतीत दर वाढ झाली नसून खत दुकानदारानी शेतकऱ्यांकडून जादा दर घेतल्यास कडक कारवाईचा इशारा सोलापूर कृषी विभागाने दिला आहे.
सोलापूर जिल्ह्यात निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत शेतकयांच्या प्रश्नांवर सध्या घमासान चर्चा होते आहे. कृषी निविष्टांवरील खर्च वाढल्याचाही मुद्दा समूह माध्यमांवर सतत उपस्थित होतो आहे. त्याचे निमित्त साधत ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर खते महागली आहेत अशी जोरदार अफवा राज्यभर पसरली होती, विशेष म्हणजे काही वृत्तवाहिन्यांनी ही अफवा खरी समजून खत दरवाढीच्या बातम्या प्रसारित केल्या. त्यामुळे राज्यभर गोंधळ उडाला. या बातम्यांमध्ये १०:२६:२६ खताच्या ५० किलोच्या गोणीचे दर १४७० रुपयांऐवजी १७०० रुपये, २४:२४:०:० श्रेणीचे दर १५५० रुपयाऐवजी १७०० रुपये २०:२०:०:० थी किंमत १२५० स्पयऐिवजी १४५० रुपये तर सिंगल सुपर फॉस्पेटण्या किमतीत ५०० रुपयांवरून ६०० रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे चुकीचे सांगण्यात आले. या बातम्यांना खरे मानत काही भागात विक्रेत्यांनी अडवणूकदेखील सुरू केल्याचे शेतकर्यांनी सांगितले.
दरम्यान, खत दर वाढीच्या अश्या खोट्या बातम्या कश्या पसरविल्या जातात हे कळत नाही. शेतकरी बांधवांनी याबाबतीत विश्वास ठेवू नये. आमच्या विभागाकडे तसे अधिकृत पत्र आलेले नाही. त्यामुळे खतांच्या दरात वाढ झालेली नाही. जर वाढ झालेली नसताना कोणी शेतकऱ्यांकडून अधिक पैसे घेत असल्यास तक्रारी कराव्यात, निश्चीत कारवाई केली जाईल असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने म्हणाले.
कृषी आयुक्तालयात दरवाढीची अफवा धडकताच स्वतः गुणनियंत्रण संचालक विकास पाटील यांनी खत उद्योगातील उच्चपदस्थ अधिकार्यांशी चर्चा केली. त्यात कोणतीही दरवाढ झालेली नसून उलट आरसीएफ कंपनीच्या एका श्रेणीची किंमत कमी झाल्याचे आयुक्तालयाच्या निदर्शनास आले. आरसीएफ कंपनीचे उपमहाव्यवस्थापक भगवानसिंह चौहान यांनी दिलेल्या लेखी पत्रात खतांचे दर नमूद केले. त्यात आरसीएफ युरियाची कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) २६६.५० रुपये (४५ किलो गोणीसाठी) तर ५० किलोची सुफला १५:१५:१५ ची किंमत १४०० रुपये, १०:२६:२६ ची किंमत १०७० रुपये तर डीएपीची किंमत १३५० रुपये अशी नेहमीप्रमाणेच स्थिर असल्याचे कळविण्यात आले.
निवडणुकीच्या वातावरणाची संधी साधत खत दरवाढीची अफवा पसरवली गेली असू शकते, असे ‘फर्टिलायझर्स असोसिएशन ऑफ इंडिया च्या सूत्रांनी सांगितले आहे. राज्यात कोणत्याही कंपनीने खतांची दरवाढ केलेली नाही. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या अफवेचा फटका बसू शकतो. मुळात केंद्र शासनाने अन्नद्रव्य आधारीत अनुदान (एनबीएस) अलीकडेच जाहीर केले आहे. त्यानुसार खत निर्मिती कंपन्या आपापल्या उत्पादनाचा निर्मिती खर्च आणि किमतीचे पुढील किमान सहा महिन्यांचे नियोजन करीत आहे. त्यामुळे मधेच खताची दरवाढ होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तर आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या कच्च्या मालाचे दर अचानक वाढल्यास कंपन्यांना खतांच्या किमतीचा आढावा ध्यावा लागतो. मात्र त्यासाठी देखील केंद्राची परवानगी घ्यावी लागते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाबाबत मोठे बदल झालेले नाहीत. त्यामुळे सध्या खतांच्या किमती स्थिर आहेत, असेही असोसिएशनच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
उलट २०:२०:०:१३ खताची नव्या पुरवठ्याची किंमत १३०० रुपयांऐवजी १२५० रुपये झाली आहे. त्यामुळे या श्रेणीचे नवे खत शेतकऱ्यांना प्रतिगोणी ५० रुपये कमी दराने मिळणार आहे, असा खुलासाही करण्यात येत आहे. खत निर्माण करणाऱ्या कंपन्या वरिष्ठ कार्यालयाकडून आम्ही खात्री केली आहे. रासायनिक खतांच्या किमती वाढलेल्या नाहीत. शेतकरी विक्रेत्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. एमआरपीपेक्षा जास्त दराने विक्री होत असल्यास शेतकयांना कृषी विभागाशी त्वरित संपर्क करा कारवाई केली जाईल.असे निविष्ठा व गुणनियंत्रण अधिकारी धनंजय पाटील यांनी सांगीतले.