28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरतालुक्यातील शेतकरी अजूनही अग्रीम पीक विम्याच्या प्रतिक्षेत

तालुक्यातील शेतकरी अजूनही अग्रीम पीक विम्याच्या प्रतिक्षेत

शिरूर अनंतपाळ : शकील देशमुख
पीक विम्याची २५ टक्के रक्कम दिवाळी पुर्वीच शेतक-यांच्या खात्यावर जमा करणार अशी शासनाने घोषणा केली. मात्र दिवाळी झाल्यानंतर ही अग्रीम पीक विम्याची अगाऊ भरपाई रक्कम अद्याप ही शेतक-यांच्या खात्यावर जमा झाली नसल्याने विमाधारक शेतक-यातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून तालुक्यातील शेतकरी अग्रीम पीक विम्याची प्रतिक्षा लागली आहे. यावर्षी मदत देताना राज्य शासनाने खरीप हंगामात झालेल्या पीकाचे नुकसान २१ दिवस जेथे पावसाचा खंड पडला आहे. त्या ठिकाणाच्या विमाधारक शेतक-यांना पीक विम्याची अग्रीम २५ टक्के रक्कम देण्याचे जाहिर केले, त्यामुळे ही रक्कम दिवाळी पुर्वी मिळेल अशी शेतकरी आस लावून बसले होते. मात्र दिवाळी पुर्वी ही रक्कम मिळाली नसल्याने शेतक-यांची निराशा झाली आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटामुळे हैराण झाले आहेत. यंदा पावसाची उघडीप त्यात सोयाबीन पीकांवर आलेला एलो मोझॅकचा धोका, अळीचा प्रादुर्भाव त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हातचा गेला.

त्यामुळे सोयाबीन पीकाचा उत्पादन खर्च देखील निघणे कठीण झाल्यामुळे बळीराजाची दिवाळी अंधारात जाणार यात काही शंका नाही म्हणून शासनाने दिवाळीपूर्वी पीक विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम शेतक-यांच्या खात्यावर जमा करेल अशी अपेक्षा होती. मात्र दिवाळी सारख्या सणाच्या काळात ही अग्रीम विम्याची रक्कम खात्यावर जमा झाली नसल्याने शासनाने एकप्रकारे थट्टाच केल्याची भावना शेतक-यांतून व्यक्त केली जात आहे. यंदा पावसाअभावी सोयाबीन हातातून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पावसाच्या खंडामुळे अग्रीम विम्याची रक्कम मंजुर झाली असली तरी अद्याप ती मिळाली नसल्यामुळे शेतक-यांचे डोळे अग्रीम पीक विम्याच्या रकमेकडे लागले असून अग्रीम विम्याची रक्कम तात्काळ देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी बांधवातून केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR