34.1 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeपरभणीशेतक-यांनी विषमुक्त अन्नधान्याची निर्मिती करावी : डॉ. स्वामी परमार्थदेव

शेतक-यांनी विषमुक्त अन्नधान्याची निर्मिती करावी : डॉ. स्वामी परमार्थदेव

परभणी : शुद्ध आणि सात्विक आहार असणे गरजेचे आहे. जसा आहार तसा विचार बनतो. शेतातील रासायनिक औषधाच्या अतिरिक वापरामुळे बहुतांश वेळेस अन्नामधून पोटामध्ये विष जाते. यामुळे अनेक विकार जडतात तसेच पर्यावरणास हानी देखील पोहचते. आज विषमुक्त अन्न मिळणे गरजेचे आहे. जगाचा अन्नदाता म्हणून शेतकरी महत्वाची भूमिका बजावतात. तेव्हा शेतक-यांनी नेसर्गिक आणि सेंद्रिय शेतीकडे वळावे आणि विषमुक्त अन्नधान्याची निर्मिती करावी. सोबतच प्रत्येकाने एक तरी देशी गाय पाळावी असे आवाहन पतंजली योगपीठाचे मुख्य केंद्रीय प्रभारी डॉ. स्वामी परमार्थदेव यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात पतंजली योगपीठ, हरिद्वार यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी कल्याण अधिकारी द्वारा विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यासाठी विशेष योग, प्राणायाम, ध्यान, आयुर्वेद पध्दती, आहार आणि आरोग चिकित्सेत अन्नदाते शेतकरी यांची भूमिका या विषयावर परिसंवादाचे आयोजन दि. २९ मार्च रोजी करण्यात आले होत. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यस्थानी कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पतंजली योगपीठाचे मुख्य केंद्रीय प्रभारी डॉ. स्वामी परमार्थदेवजी हे होते.

यावेळी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, संचालक संशोधन डॉ. जगदीश जहागीरदार, पतंजली भारत स्वाभिमान न्यासचे राज्य प्रभारी भालचंद्रबापू पाडाळकर, पतंजली किसान सेवा समिती राज्य प्रभारी उदय वाणी यांची उपस्थिती होती

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR