34.1 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeपरभणीकॉल्पोस्कोपी व पॅपस्मीयर तपासणी शिबिरासाठी ७० महिलांची नोंदणी

कॉल्पोस्कोपी व पॅपस्मीयर तपासणी शिबिरासाठी ७० महिलांची नोंदणी

परभणी : महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी महिला संगठन अंतर्गत परभणी जिला संजीवन सिद्धा स्वास्थ्य समिति द्वारा आयोजित गर्भाशय मुखाची दुर्बिनव्दारा तपासणी (कॉल्पोस्कोपी) व पॅपस्मीयर तपासणी शिबिराचे उद्घाटन ३० मार्च रोजी चांडक हॉस्पिटल डॉक्टर लेन परभणी येथे करण्यात आले. २ दिवस चालणा-या या शिबिरात तपासणीसाठी ७० महिलांची नोंद करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणी महिला जिल्हाध्यक्ष विजया बांगड होत्या. प्रमुख अतिथि म्हणून राष्ट्रीय साहित्य समिति सहप्रभारी सरोज गट्टाणी तर उद्धघाटक महाराष्ट्र प्रदेश संजीवन सिध्दा स्वास्थ्य समिति संयोजिका डॉ.जयश्री कालानी, कांचन बाहेती, परभणी जिल्हा सचिव ममता काबरा, परभणी जिला संजीवन सिद्धा स्वास्थ्य समिति संयोजिका डॉ. संतोष चांडक, डॉ. स्नेहल कडे, डॉ. प्रिया राठी, नंदा भक्कड़, आरती मंत्री, नेहा दरक, पुष्पा तोषनीवाल, कल्पना मंत्री, कमलाबाई अग्रवाल, सुनीता मानधनी, सुचिता परतानी, कोमल माहेश्वरी, किरण माहेश्वरी, प्रेमा तापड़िया, माला शर्मा, आशा चांडक, सीमा लाहोटी, शितल मंत्री, कल्पना बिर्ला, राजस्थानी समाजातील सर्व महिला बहु संख्येने उपस्थित होत्या.

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. आरजू सोनी, डॉ. श्रेया चांडक, डॉ. कृष्णप्रिया तापड़िया, डॉ. निहार चांडक यांनी मेहनत घेतली. बुलढाणा येथील डॉ. नेहा रवि राठी यांनी गर्भाशय मुखाची तपासणी का करावी या विषयावर झूम अ‍ॅपवर व्याख्यानही दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR