17.5 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeराष्ट्रीयशेतक-यांची कर्जमाफी होणार, लिहून घ्या

शेतक-यांची कर्जमाफी होणार, लिहून घ्या

राहुल गांधींचे आश्वासन काँग्रेसने २०१८ मध्ये दिलेले आश्वासन पूर्ण केले

अंबिकापूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी अंबिकापूरच्या सरगुजा येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. या बैठकीत त्यांनी छत्तीसगडमधील शेतक-यांना कर्जमाफीचे आश्वासन देतानाच केंद्रातील सत्ताधारी भाजपावरही जोरदार टीका केली. राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसने २०१८ मध्ये दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे.

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यात शेतक-यांना कर्जमाफी देण्याच्या आश्वासनाचा पुनरुच्चार करताना, पेन काढा आणि लिहा, शेतक-यांची कर्जमाफी होईल. २०१८ मध्ये आम्ही शेतक-यांना दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. छत्तीसगडशी माझे जुने नाते आहे असे म्हटले. मी तुम्हाला दोन-तीन आश्वासने दिली होती. आमचे सरकार आल्यावर दोन-तीन काम नक्कीच होतील, असे आम्ही म्हटले होते. शेतक-यांची कर्जमाफी हे सर्वात मोठे काम होते, ही काही छोटी गोष्ट नव्हती. त्यावेळी भाजपाच्या सर्व नेत्यांनी काँग्रेस पक्ष खरें बोलत नसल्याचे म्हटले होते असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही उपस्थित केला. ते सरगुजामध्ये म्हणाले, मोदीजींना जातनिहाय जनगणना करायची नाही. ते म्हणतात गरीब ही फक्त एक जात असते. मोदीजींच्या मते ओबीसी ही जात नाही. देश चालवण्यात मागासवर्गीयांचा सहभाग नाही. नरेंद्र मोदींकडे जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी आहे पण त्यांना ती दाखवायची नाही.

नोटाबंदी सुनियोजित कट
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, नोटबंदीमुळे देशाला मोठे नुकसान झाले आहे. याद्वारे देशातील ९९ टक्के जनतेवर हल्ला करण्यात आला. आपल्या जवळच्या व्यक्तींना याद्वारे फायदा पोहचवण्यात आला. ते म्हणाले की, नोटाबंदी हा सुनियोजित कट होता. यामुळे रोजगार नष्ट झाले असून अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. त्यांनी नोटाबंदीला एक शस्त्र म्हटले, ज्याद्वारे परम मित्राची पिशवी भरली गेली. ६०९ क्रमांकावर असलेले उद्योगपती जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले.

लाखो लोकांच्या नोक-या गेल्या
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. भारतीय नोटाबंदीचा फटका अजूनही सहन करत आहेत. यामुळे छोटे उद्योग बंद पडले आणि लाखो लोकांच्या नोक-या गेल्या. नोटाबंदीमुळे करोडो लोकांना स्वत:च्या पैशाची वाट पाहत रांगेत उभे राहावे लागले. केंद्रावर हल्ला करताना खर्गे म्हणाले की, ८६.४ टक्के नोटा चलनातून बाद केल्याशिवाय आपण कॅशलेस अर्थव्यवस्था का होऊ शकलो नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR