28.7 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeराष्ट्रीयफास्टॅग होणार बहुपयोगी

फास्टॅग होणार बहुपयोगी

टोलच नाही तर पार्किंग, पेट्रोल पंप, विम्याचे पैसे देता येणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

नवी दिल्ली : फास्टॅग ही सध्या भारतात प्रचलित असलेली इलेक्ट्रॉनिक्स टोल गोळा करण्याची प्रणाली आहे. या माध्यमातून देशभरातील राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर टोल गोळा केला जातो. आता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ही प्रणाली अधिक सोपी आणि बहुपर्यायी करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

फास्टॅगचा उपयोग फक्त टोल जमा करण्यापुरता होऊ नये, त्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांची चार्जिंग, पार्किंग शुल्क, पेट्रोल पंप आणि वाहनांचा विमा यासारख्याही सुविधा दिल्या जाव्या असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने म्हटले आहे. यामुळे केवळ सामान्य लोकांना सुविधा मिळणार नाही तर डिजिटल ट्रान्जेक्शन वाढणार आहे. इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड(आयएचएमसीएल) ही कंपनी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) अंतर्गत काम करते. या कंपनीची फिनटेक कंपनीसोबत बैठक झाली. या बैठकीत फास्टॅगचे पर्यायी उपयोग, नियम-कायदे, ग्राहक तक्रारी, डेटा सुरक्षा यावर चर्चा झाली.

फास्टॅगचा वापर टोलसह इतर पर्यायांवर करणे खूप फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे फास्टॅगचा विस्तार होणार आहे. फिनटेक कंपनीला मल्टी-लेन फ्री फ्लो टोलिंग सिस्टमसोबत जोडण्यासाठी ही बैठक झाली. या तंत्रज्ञानामुळे वाहन टोल बूथवर थांबवण्याची गरज नाही. आएफआयडी रीडर आणि एएनपीआर कॅमेराच्या मदतीने वाहनांची ओळख केली जाईल. त्यानंतर अटॅमिटॅक प्रणालीमुळे फास्टॅगने पैसे कापले जातील. सध्या एनईटीसी फास्टॅग प्रोगाम अंतर्गत देशभरात १७२८ टोल प्लाझा सक्रीय आहेत. त्यात १११३ राष्ट्रीय महामार्ग आणि ६१५ राज्य महामार्गांचा समावेश आहे. जवळपास ९८.५% टक्के टोल फास्टॅगच्या माध्यमातून मिळतो. आतापर्यंत ११.०४ कोटींपेक्षा जास्त फास्टॅग देण्यात आले आहे. ३८ बँकांच्या माध्यमातून हे फास्टॅग उपलब्ध आहे.

ट्रान्सपोर्ट सेक्टरमध्ये डिजिटल क्रांती : गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले की, फास्टॅग प्रणालीतून अनेक गोष्टी करता येणार आहे. फक्त टोलपुरता फास्टॅग मर्यादीत राहणार नाही. देशभरात स्मार्ट टॅव्हलसाठी फास्टॅगचा वापर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी फिनटेक कंपनी, टेक्नोलॉजी एक्सपर्ट्स आणि इतरांनी मिळून फास्टॅगला एक मल्टी-फंक्शनल डिजिटल प्लेटफॉर्म बदलण्याचे काम सुरु केले आहे. ट्रान्सपोर्ट सेक्टरमध्ये ही डिजिटल क्रांती असणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR