28.5 C
Latur
Tuesday, May 28, 2024
Homeमहाराष्ट्र६० मुलांसह बापाने केले मतदान

६० मुलांसह बापाने केले मतदान

पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्­या आश्रमाची ऐतिहासिक नोंद

अमरावती : रस्­त्­याच्­या कडेला सोडून दिलेल्­या बेवारस, दिव्­यांग मुलांना पितृछत्र देऊन त्­यांच्­या पुनर्वसनासाठी आयुष्­यभर धडपड करणारे ज्­येष्­ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांच्­या अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य दिव्यांग, बेवारस बालगृहाच्या इतिहासात मतदानाची महत्­वपूर्ण नोंद झाली आहे. बेवारस मुलांना वडिलांचे नाव देणारे शंकरबाबा पापळकर आपल्­या ६० मुलांसह वझ्झर येथील प्राथमिक शाळेच्­या २१५ क्रमांकाच्­या मतदान केंद्रावर पोहचले. या सर्वांनी मतदानाचा हक्­क बजावला.

दृष्टिहीन, मूकबधीर व पोलिओग्रस्त मुलांचासुद्धा त्यात समावेश आहे. गेल्या १५ ते२० वर्षांपासून ही मुले या बालगृहात राहत आहेत. सर्वांच्या नावापुढे शंकरबाबा पापळकर हेच नाव असल्याने तेच त्यांचे पिता आहेत. रस्त्यावर, कचराकुंडीत, रेल्वेस्टेशन, बसस्थानकावर तसेच अन्य ठिकाणी टाकून दिलेल्या मुलांचा सांभाळ शंकरबाबा पापळकर पित्याप्रमाणे करतात. या मुलांना रोजगार मिळवून देण्यासोबतच त्यांचे लग्न लावून देण्याचे अतिशय आव्हानात्मक कार्य शंकरबाबांनी गेल्या अनेक वर्षांपासून हाती घेतले आहे. आपल्या मुलांना मतदानाचा हक्क मिळावा, यासाठीसुद्धा त्यांनी चांगलाच लढा दिला.

गेल्­या लोकसभा निवडणुकीत येथील ४८ मुलांनी मतदानाचा हक्­क बजावला होता. यावेळी त्­यांनी मतदान जनजागृतीसाठीही प्रयत्­न केले. प्रत्­येकाने लोकशाही समृद्ध करण्­यासाठी मतदानाचा हक्­क बजावला पाहिजे, असे आवाहन शंकरबाबा पापळकर यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR