39.1 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeधाराशिवकळंब बसस्थानकात बसखाली चेंगरून प्रवाशाचा मृत्यू

कळंब बसस्थानकात बसखाली चेंगरून प्रवाशाचा मृत्यू

धाराशिव : प्रतिनिधी
कळंब येथील बसस्थानकात बसखाली चेंगरून केज तालुक्यातील काळेगाव येथील एका प्रवाशाचा मृत्यू झाला. ही घटना दि. २४ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. महादेव केरबा धीवार (वय ७५) असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. या प्रकरणी बस चालकाच्या विरोधात कळंब पोलीस ठाण्यात दि. २५ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, केज तालुक्यातील काळेगाव येथील ७५ वर्षीय प्रवाशी दि. २४ एप्रिल रोजी कळंब येथे आले होते. ते गावाकडे परत जाण्यासाठी कळंब बसस्थानकात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आले होते. त्यावेळी बस चालक बस मागे घेत असताना प्रवाशी महादेव धीवार यांच्या अंगावरून गेली.

यामध्ये ते गंभीर जखमी होऊन त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. कळंब बसस्थानक येथे महादेव धीवार उभे असताना बस क्र एमएच १४ बीटी १६३२ च्या चालकाने त्याच्या ताब्यातील बस ही हायगई व निष्काळजीपणे चालवून त्यांना डाव्या साईडने धडक देवून पाठीमागील चाक त्यांच्या अंगावरून गेले. या अपघातामध्ये महादेव धीवार गंभीर जखमी होवून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयत महादेव धीवार यांचा नातु आदित्य सुभाष धीवार यांनी दि.२५ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पोलीस ठाणे येथे बस चालकाच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR