29.8 C
Latur
Sunday, May 5, 2024
HomeFeaturedसलमानच्या घरावरील गोळीबार; ४० गोळ्या झाडण्याचे आदेश

सलमानच्या घरावरील गोळीबार; ४० गोळ्या झाडण्याचे आदेश

मुंबई : सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी आज मोठा गौप्यस्फोट झाला. सलमान खानच्या घरावर आरोपींना गोळ्यांचा वर्षाव करण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली. आरोपींना ४० गोळ्या झाडण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, आरोपींनी फक्त पाच गोळ्या झाडल्या, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात गँगस्टर लॉरेन बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई यालाही आरोपी करण्यात आले आहे.

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी मुंबई पोलिसांनी धक्कादायक माहिती उघड केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या घरावर गोळीबार करून आरोपींनी पळ काढला. त्यांनी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी अनेकदा कपडेही बदलले. हे दोन्ही आरोपी इंटरनेटच्या माध्यमातून तिस-या व्यक्तीच्या संपर्कात होते. यासाठी आरोपींचा एक मोबाइल वाय-फायने जोडलेला होता.

सलमान खानच्या घरावर गोळीबार करणा-या आरोपींना राज्याच्या बाहेरूनही मदत पुरवण्यात आली. यामध्ये राजस्थान, बिहार आणि हरियाणातून आरोपींना मदत पुरवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आरोपींना २९ एप्रिलपर्यंत कोठडी
सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात आरोपी सागर पाल आणि विकी गुप्ता यांना मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे आता पोलीस चौकशीत आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR