35.6 C
Latur
Sunday, May 5, 2024
HomeFeaturedपाटण्यात हॉटेलमध्ये भडका; ६ ठार, २० जण होरपळले

पाटण्यात हॉटेलमध्ये भडका; ६ ठार, २० जण होरपळले

 

पाटणा : बिहारची राजधानी असलेल्या पाटणा शहरात आगीची भीषण घटना घडली असून या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेतील जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, अद्यापही ७ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ३ महिला आणि ३ पुरुषांचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक चंद्र प्रकाश यांनी माध्यमांशी बोलताना दिली. पाटणा स्टेशनपासून जवळच असलेल्या पाल हॉटेलसह तेथील रेस्टॉरंटमध्ये ही आग लागल्याची घटना घडली. आगीच्या घटनेनंतर रेस्टॉरंटमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग भडकल्याची प्राथमिक माहिती आहे.

पाल हॉटेलमधील आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. मोठ्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली, पण तोपर्यंत २ जणांचा जागेवरच मृत्यू झाला होता. तर, २० जण आगीत होरपळले होते. आगीतील जखमींना रुग्णालयात दाखल केले असता, तिथे चार जणांनी प्राण सोडले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR