28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयदोन गटांमध्ये गोळीबार; १३ जणांचा मृत्यू

दोन गटांमध्ये गोळीबार; १३ जणांचा मृत्यू

इंफाळ : मणिपूरच्या तेंगनौपाल जिल्ह्यात सोमवारी दोन गटामध्ये जोरदार गोळीबार झाला. या घटनेत किमान १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोमवारी दुपारी लीथू गावात ही घटना घडली. तेंगनौपाल जिल्ह्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, म्यानमारकडे जाणाऱ्या एका गटावर या भागात वर्चस्व असलेल्या दुसऱ्या गटाने हल्ला केला. घटनास्थळी पोहोचलेल्या सुरक्षा दलांना आतापर्यंत १३ मृतदेह सापडले आहेत. ठार झालेल्या लोकांची अद्याप ओळख पटलेली नाही. तेंगनौपाल जिल्ह्याची सीमा म्यानमारसोबत आहे.

या वर्षी मे महिन्यात राज्यात हिंसाचाराची ठिणगी पेटली होती. यानंतर हजारो लोकांना विस्थापित व्हावे लागले आणि सुमारे १७५ लोकांना आपला जीव गमवावा लागला. बहुतांश भागात अजूनही इंटरनेट बंद आहे. सीबीआय हिंसाचाराशी संबंधित प्रकरणांचा तपास करत आहे. या हिंसाचाराकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. संसद असो वा निवडणूक रॅली, हिंसाचारावरून विरोधी पक्ष भाजप सरकारवर निशाणा साधत आहेत. अलीकडेच युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट (युएनएलएफ) या मणिपूरमधील सर्वात जुनी उग्रवादी संघटनेने शांतता करारावर स्वाक्षरी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR