हैदराबादचा संघ ८६ धावांत गारद, गुजरात विजयी

अहमदाबाद : आयपीएल २०२६ मधील ५६ वा सामना पूर्णपणे एकतर्फी ठरला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात गुजरात टायटन्स ने सनरायझर्स हैदराबादवर तब्बल ८२ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

धावांच्या फरकाने मिळालेला हा गुजरातचा आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने १६८ धावा उभारल्या होत्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादचा संपूर्ण संघ अवघ्या १४.४ षटकांत ८६ धावांवर गारद झाला. गुजरातच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच हैदराबादच्या फलंदाजांवर दबाव निर्माण केला आणि सामना एकहाती जिंकून दाखवला. या शानदार विजयासह गुजरात टायटन्स ने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सची सुरुवात खराब झाली होती. कर्णधार शुभमन गिल (५) आणि जोस बटलर (७) स्वस्तात बाद झाले. मात्र, साई सुदर्शनने एका बाजूने खिंड लढवत ४४ चेंडूत ६१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याला वॉशिंग्टन सुंदरची (५० धावा) उत्तम साथ मिळाली. या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर गुजरातने निर्धारित २० षटकांत ५ बाद १६८ धावांचे लक्ष्य उभे केले. हैदराबादकडून प्रफुल हिंगे आणि साकिब हुसैन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

फलंदाजीचा सपशेल फ्लॉप शो
१६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात अत्यंत खराब राहिली. ट्रॅविस हेड शून्यावर बाद झाला आणि त्यानंतर ठराविक अंतराने विकेट्स पडत राहिल्या. नितीश कुमार रेड्डीने सर्वाधिक २४ धावा केल्या तर कर्णधार पॅट कमिन्सने १९ धावांचे योगदान दिले. मात्र, इतर एकाही फलंदाजाला तग धरता आला नाही. संपूर्ण संघ १४.५ षटकांत केवळ ८६ धावांवर आटोपला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|काँग्रेसचा उमेदवार असता तर माघार घेतली असती; उबाठाला जागा सुटल्याने निवडणूक लढणार– इंगोले
01:20
Video thumbnail
जळकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; वातावरणात पसरला गारवा
00:49
Video thumbnail
Latur|आमदार पुत्र ऋषिकेश कराड यांच्यावर जमीन खोदल्याचा आरोप; शेतकऱ्याची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार!
05:03
Video thumbnail
Nanded|प्रवीण पाटील चिखलीकर यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार
08:45
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषद निवडणुकीतून माधवराव पाटील जवळगावकर यांची माघार
02:21
Video thumbnail
Nanded|अर्धापुरात दमदार पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
01:16
Video thumbnail
Latur|भूकंपग्रस्ताची तहसीलदारांकडून हेळसांड? न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या
01:38
Video thumbnail
Latur|अहिल्यादेवी जयंती न साजरी केल्याने ग्रामसेवकांवर कारवाईची टांगती तलवार
03:57
Video thumbnail
RCC CLASSES|फी परत करा, परवाना रद्द करा; RCC विरोधात हजारोंच्या आंदोलनाचा इशारा
01:27
Video thumbnail
सोलापुरात विषारी मद्यविरोधात प्रशासनाची धडक कारवाई; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त, ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण
03:08
Video thumbnail
मोहोळ-वैराग रस्ता रुंदीकरण: मोबदल्याशिवाय काम नको! बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; हायकोर्टात धाव
02:23
Video thumbnail
Latur|तहसीलदारांसमोरच अंगावर पेट्रोल ओतल्याने खळबळ;पाच महिन्यांपासून प्रकरण प्रलंबित असल्याचा आरोप
01:56
Video thumbnail
Shivraj Motegavkar|कुलकर्णीच्या प्रॉपर्टीवर बुलडोजर;मोटेगावकरच्या इमारतीवर कारवाई कधी?"
02:48
Video thumbnail
Latur Airport|लातूर विमानतळ विकासाला गती; उद्योग-पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा
03:39
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये भोंदूबाबाचा भांडाफोड;खोपेगावातील कथित बाबाचा दरबार बंद
03:01

Latest news