पाकच्या इतिहासात पहिल्यांदाच आयएसआय प्रमुखाला शिक्षा

इस्लामाबाद : भारताविरोधात कटकारस्थाने रचणारी पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर-सर्विसेज इंटेलिजेंसचे माजी महासंचालक लेफ्टनंट जनरल(निवृत्त) फैज हमीद यांना लष्करी कोर्ट मार्शलने १४ वर्षांची कठोर शिक्षा सुनावली आहे. यामुळे पाकिस्तानच्या राजकीय आणि लष्करी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आयएसआयच्या प्रमुखाला एवढ्या मोठ्या स्तरावर शिक्षा होण्याची ही पाकिस्तानी इतिहासातील पहिलीच घटना आहे.

लेफ्टनंट जनरल (निवृत्त) फैज हमीद यांना ‘ऑफिशियल सीक्रेट अ‍ॅक्ट’चे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि इतर गंभीर आरोपांखाली दोषी ठरवण्यात आले आहे. पाकिस्तानी लष्कराची मीडिया विंगने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२४ मध्ये फील्ड जनरल कोर्ट मार्शलद्वारे फैज हमीद यांच्याविरुद्ध कार्यवाही सुरू करण्यात आली होती. १५ महिने चाललेल्या या प्रक्रियेनंतर त्यांना दोषी ठरवण्यात आले आणि ११ डिसेंबरपासून ही शिक्षा लागू करण्यात आली आहे. हमीद हे २०२०-२१ मध्ये आयएसआय प्रमुख असताना, अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यावर ते अचानक काबुलमध्ये एका हॉटेलमध्ये चहा पिताना दिसले होते, ज्यामुळे ते जगभरात चर्चेचा विषय बनले होते.

प्रमुखपदाव्यतिरिक्त त्यांनी पेशावरचे कॉर्प्स कमांडर पदही सांभाळले होते. सध्या पाकिस्तानी लष्कर फैज हमीद यांची राजकीय घटकांशी असलेली कथित संगनमत आणि अस्थिरतेशी संबंधित प्रकरणांची वेगळी चौकशी करत आहे. या प्रकरणातही त्यांना शिक्षा होण्याची शक्यता आहे. मात्र, लष्कराने फैज हमीद यांना अपील करण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे.

आरोप काय?
फैज हमीद यांच्यावर मुख्यत्वे राजकीय गतिविधींमध्ये सहभाग, गुपित कायद्याचे उल्लंघन, अधिकारांचा गैरवापर, सरकारी संसाधनांचा दुरुपयोग आणि संबंधित व्यक्तींना बेकायदेशीरपणे नुकसान पोहोचवणे, यांसारखे गंभीर आरोप सिद्ध झाले आहेत. फैज हमीद हे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते. विद्यमान लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या विरोधी गटातील ते असल्याने त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता होती.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43
Video thumbnail
ज्या जनावरांनी शेतात साथ दिली, त्यांनाच विकायची वेळ; जळकोटमधील शेतकऱ्यांची व्यथा
02:30
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54
Video thumbnail
Bashir Shaikh|न्यायालयाच्या आवारातच बशीर शेखला मारहाण; सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
02:27
Video thumbnail
Latur|बशीर शेखसह गंभीर गुन्हेगारांचं वकीलपत्र घेऊ नका; लातूर जिल्हा वकील मंडळाचं आवाहन
06:34
Video thumbnail
Latur|फरार बशीर शेखला अखेर बेड्या; बार्शीतून लातूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
03:24
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31

Latest news