29.3 C
Latur
Sunday, April 21, 2024
Homeधाराशिवशाळकरी अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणा-याला सक्तमजुरी

शाळकरी अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणा-याला सक्तमजुरी

धाराशिव : प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणा-या अल्पवयीन शाळकरी विद्यार्थीनीचा विनयभंग करणा-या नळदुर्ग ता. तुळजापूर शहरातील मैनोद्दीन अहेमदअली काझी याला धाराशिव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी ३ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

धाराशिव येथील अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अ‍ॅड. सचिन सुर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गावातील एक शाळकरी अल्पवयीन मुलगी ही शाळेतून गावाकडे जाण्यासाठी ४ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास नळदुर्ग येथील बसस्थानकामध्ये अन्य विद्यार्थ्यांसह उभी होती. ती बसमध्ये चढल्यानंतर खूप गर्दी असल्याने अन्य विद्यार्थी व पिडीता उभी होती. त्यावेळी बसमध्ये सीटवर बसलेल्या मैनोद्दीन काझी रा. नळदुर्ग याने त्या पिडीतेला वाईट उद्देशाने स्पर्श करून विनयभंग केला होता.

याबाबत पिडीतेने नळदुर्ग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. नळदुर्ग ठाण्याचे तत्कालिन पोलीस उपनिरिक्षक एम. एम. शहा यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या गुन्ह्यात न्यायालयाने फिर्यादीच्या वतीने १० साक्षीदार तपासले. या प्रकरणाची सुनावणी धाराशिव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगताप यांच्या समोर झाली. त्यानंतर न्यायाधीश श्री. जगताप सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या समोर सुनावणी झाली.

न्यायालयासमोर आलेला साक्षीपुरावा व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अ‍ॅड. सचिन सुर्यवंशी यांनी केलेला युक्तीवाद ग्रा मानून न्यायाधीश अंजू शेंडे यांनी आरोपी मैनोद्दीन अहेमदअली काझी यास बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम ८ नुसार दोषी धरून आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अ‍ॅड. सुर्यवंशी यांना कोर्ट पैरवी पोलीस उपनिरिक्षक राजेश म्हेत्रे, कॉ. सुधाकर सगर यांनी सहकार्य केले. अभियोग पक्षाच्या वतीने अतिरिक्त अभियोक्ता सचिन सुर्यवंशी यांनी बाजू मांडली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR