36.4 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeनांदेडमहावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास ग्राहकाकडून मारहाण

महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास ग्राहकाकडून मारहाण

नांदेड : प्रतिनिधी
थकीत बिलासाठी वीज कनेक्शन तोडल्याच्या कारणाहून महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यासह सहका-यास ग्राहकाने मारहाण केली. ही घटना मौ. काटकळंबा ता. कंधार येथे घडली. मार्च एन्डमुळे महावितरण कंपनीकडून थकीत वीज बिल वसुली मोहिम सुरू आहे. दि. १५ रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास मौजे काटकळंबा येथे एक पथक गेले होते.

यावेळी आरोपी ग्राहकाने तुम्ही माझे वीज कनेक्शन कसे काय तोडता असे म्हणून फिर्यादी कनिष्ठ अभियंता श्रीकांत बळवंत नरवाडे व सहका-यास शिवीगाळ केली. यानंतर कॉलर धरून नरवाडे यांच्या गालावर चापट मारून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी उस्माननगर पोलिस ठाण्यात आरोपीविरूद्ध कलम ३५३, ३२३, ५०४ व ५०८ नूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोउपनि केंद्र हे करीत आहेत. काही दिवसांपुर्वी वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या अभियंत्यांस मुखेड तालुक्यातही मारहाण झाली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR