35.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूरराज्यात सर्वाधिक पुरस्कार निधी लातूर जिल्ह्याला

राज्यात सर्वाधिक पुरस्कार निधी लातूर जिल्ह्याला

लातूर : प्रतिनिधी
रुग्­णालयातील स्­वच्­छता व टापटीप, जैव वैद्यकीय कचरा व्­यवस्­थापन, संसर्ग नियंत्रणासाठी केलेले प्रयत्­न,  इतर समर्थन सेवा, स्­वच्­छता प्रचार व प्रशिक्षण सेवा आदी विविध निकषांच्­या आधारे कायाकल्­प पुरस्­कारासाठी आरोग्­य संस्­थाची निवड करण्­यात येते. या निकषानुसार सन 2022-2023 कायाकल्­प पुरस्­कार राज्­यस्­तरावरुन घोषित झाले. लातूर जिल्ह्यातील कासार बालकुंदा (ता. निलंगा) प्राथमिक आरोग्­य केंद्र  या आरोग्­य संस्­थेस 2 लाख रुपयांचा कायाकल्­प प्रथम पुरस्­कार जाहीर झाला आहे. तसेच राज्यात सर्वाधिक पुरस्कार निधी लातूर जिल्ह्याला मिळाला आहे.
जिल्­हा आरोग्­य अधिकारी स्­तरावरील निटूर, हंडरगुळी, हाडोळती,  हलगरा, शिरुर ताजबंद, लामजना, वांजरवाडा, देवर्जन, हेर, गुडसुर, अतनुर, जवळा बु. नळेगांव, नळगीर, अंधोरी, पानंिचचाली, चिंचोली ब., जवळगा पोमादेवी, बोरी, निवळी,  तांदुळजा,  गंगापूर,  चापोली,  उजनी,  खरोळा, कारेपूर,  भातांगळी, चिकुर्डा मातोळा, भादा, बिटंरगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची कायाकल्­प प्रोत्­साहनपर पुरस्­काराकरीता निवड राज्­यस्­तरावरुन करण्­यात येऊन या संस्­थाना प्रत्­येकी रुपये 50 हजार रुपयांचा पुरस्­कार जाहीर झाला आहे. या प्राथमिक आरोग्­य केंद्राची तपासणी नांदेड व धाराशिव जिल्ह्यातील मूल्­यांकनकर्तामार्फत करण्­यात आली होती.
जिल्­हा आरोग्­य अधिकारी स्­तरावरुन किनी यल्­लादेवी आरोग्य वर्धिनी केंद्राला एक लाख रुपयांच्या जिल्­हास्­तरीय प्रथम पुरस्­कार , तर काजळ हिप्­परगा, आरोग्­य वर्धिनी केंद्र या संस्­थेस जिल्­हास्­तरीय द्वितीय पुरस्­कार ५० हजार रुपये तसेच घोणशी आरोग्­य वर्धिनी केंद्र  या संस्­थेस जिल्­हास्­तरीय तृतीय पुरस्­कार रुपये २५ हजार जाहीर झाला आहे. तसेच लातूर जिल्­ह्यातील १०८ आरोग्­य वर्धिनी केंद्रास प्रोत्­साहनपर रुपये २५ हजार पुरस्­कार जाहीर झाला आहे. जिल्­हा शल्­य चिकित्­सक स्­तरावरील लातूर स्­त्री रुग्­णालय, उदगीर सामान्­य रुग्­णालय, निलंगा उपजिल्­हा रुग्­णालय, मुरुड ग्रामीण रुग्­णालय, अहमदपूर ग्रामीण रुग्­णालय, किल्­लारी ग्रामीण रुग्­णालय, चाकूर ग्रामीण रुग्­णालय, रेणापूर ग्रामीण रुग्­णालय, बाभळंगाव ग्रामीण रुग्­णालय, देवणी ग्रामीण रुग्­णालय या आरोग्­य संस्­थाची कायाकल्­प प्रोत्­साहनपर पुरस्­काराकरीता राज्­यस्­तरावरुन निवड झालेली आहे. या संस्­थाना प्रत्येकी एक लाख रुपये जाहीर झाला आहे.
कायाकल्­प पुरस्­कार सन २०२२-२०२३ अंतर्गत राज्­यात सर्वाधिक पुरस्­कार निधी रुपये ५८ लाख ३५ हजार रुपये लातूर जिल्ह्याला जाहीर झालेला आहे. जिल्ह्यातील ३२ प्राथमिक आरोग्­य केंद्राना रुपये १७ लाख ३५ हजार रुपये पुरस्­कार निधी, १११ आरोग्­य वर्धिनी केंद्राना २८ लाख ८५ हजार रुपये पुरस्­कार निधी व जिल्­हा शल्­य चिकित्­सक अंतर्गत रुग्­णालयांना १२ लाख रुपये पुरस्­कार निधी जाहीर झालेला आहे.    कायाकल्­प पुरस्­काराकरीता जिल्हा परिषदेचे मुख्­य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्­हा आरोग्­य अधिकारी डॉ. एच.व्­ही.वडगावे,  जिल्­हा शल्­य चिकित्­सक डॉ. प्रदीप ढेले,  जिल्­हा माताबालसंगोपन अधिकारी डॉ. बोडके एन. डी., सहा. जिल्­हा आरोग्­य अधिकारी डॉ. पंडगे ए.सी., अति. जिल्­हा आरोग्­य अधिकारी डॉ. बरुर बी. एस., ता.आ.अ. उदगीर डॉ. कापसे पी.एस., जिल्­हा गुणवत्­ता नियमन समन्­वयक डॉ. रेड्डी पी.ए. यांनी कायाकल्­प अभियानाच्­या अनुषंगाने जिल्­हयातील अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR