32.6 C
Latur
Friday, April 18, 2025
Homeमहाराष्ट्रमाजी आमदार बाबर शिंदे सेनेत जाणार

माजी आमदार बाबर शिंदे सेनेत जाणार

पुणे : विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर आता राज्यभरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्के बसत आहेत. पुण्यातील कट्टर शिवसैनिक महादेव बाबर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी शिंदे यांची भेट घेतली.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश होईल. महादेव बाबर हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. यंदाही ते विधानसभा निवडणूक लढण्यास उत्सुक होते. पण महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटली. त्यामुळे बाबरांची विधानसभा निवडणूक लढण्याची संधी हुकली. त्यानंतर बाबर नाराज झाले होते. विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या पक्षाचे पानीपत झाल्यानंतर बाबर यांनी आता शिंदेंच्या शिवसेनेचा रस्ता धरला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR