24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमाजी आमदार संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

माजी आमदार संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

बीड : प्रतिनिधी
राज्यातील विधानसभा निवडणुकीत यंदा प्रथमच महाविकास आघाडी व महायुती म्हणून लढत होत आहेत. त्यामुळे, यंदा जागावाटपात मोठा क्लिष्ट पाहायला मिळाला. तर, एकच जागा असल्याने विधानसभा मतदारसंघातील अनेक इच्छुकांची नाराजी झाली.

त्यामुळे, राज्यातील बहुतांश मतदारसंघांत बंडखोरी झाल्याचे दिसून आले. पण, बंडखोरीनंतरही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला आहे. अनेक बंडखोरांची तलवार मान्य करण्यात पक्षाला यश आले.

मात्र, काही इच्छुकांनी अखेरपर्यंत बंडखोरी कायम ठेवली तर काहींनी पक्षांतर केले. त्यामध्ये, केज विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे महायुतीचे टेन्शन वाढले होते. आता, संगीता ठोंबरे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत हाती तुतारी घेतली आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांचे टेन्शन वाढले आहे.

केज विधानसभा मतदारसंघातून नमिता मुंदडा यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी संगीता ठोंबरे यांनी केज विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागे घेतली. आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेत ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पाठिंबा दिला. त्यामुळे संगीता ठोंबरे यांनी थेट भाजपाला आव्हान दिले आहे. त्यानंतर, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR