हैदराबाद : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि बीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव (केसीआर) हे जखमी झाले असून त्यांना यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी मध्यरात्री ते त्यांच्या अरवली फार्महाऊसवर होते, तेथे ते पडल्यामुळे हाडात फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या ते हैदराबादच्या यशोदा हॉस्पिटलमध्ये असून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.