32.5 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeराष्ट्रीयगरिबांसाठी चार कोटी घरे बांधली : पंतप्रधान मोदी

गरिबांसाठी चार कोटी घरे बांधली : पंतप्रधान मोदी

इंदूर : मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीपूर्वी सतना येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांच्या सरकारने गरीबांसाठी चार कोटी पक्की घरे बांधली आहेत, परंतु त्यांनी ‘स्वतःसाठी एकही घर बांधले नाही. तुमच्या मताने पुन्हा भाजपचे सरकार बनणार आहे. तुमच्या मतामुळे दिल्लीत मोदींना बळ मिळेल. तुमचे मत काँग्रेसला मध्य प्रदेशमध्ये सरकार बनवण्यापासून शंभर मैल दूर ठेवेल. तुमचे एक मत म्हणजे तीन चमत्कार, असे मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले की, मध्य प्रदेशातील मतदारांचे प्रत्येक मत ‘त्रिशक्ती’ने भरलेले आहे, जे भारतीय जनता पक्षाला मध्य प्रदेशात पुन्हा सरकार स्थापन करण्यास, केंद्रात पंतप्रधानांना बळकट करण्यास मदत करेल. राज्यातील सरकार मजबूत करा, काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यास मदत होईल. काँग्रेसने सरकारी योजनांचे कोट्यवधी बनावट लाभार्थी तयार केले होते, त्यांना केंद्रातील भाजप सरकारने काढून टाकले.

पंतप्रधान म्हणाले की, देशात त्यांचे सरकार आल्यानंतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या काँग्रेसने तयार केलेल्या १० कोटी बनावट लाभार्थ्यांना रेकॉर्डमधून काढून टाकण्यात आले आहे. काँग्रेसकडे मध्य प्रदेशसाठी कोणताही रोडमॅप नाही, तर दुसरीकडे मोदींची हमी म्हणजे आश्वासने पूर्ण करण्याची हमी, असे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR