28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयकारमधील चार जणांचा होरपळून मृत्यू

कारमधील चार जणांचा होरपळून मृत्यू

गुरुग्राम : काल रात्री गुरुग्राममध्ये भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात तिघांचा होरपळून मृत्यू झाला. हा अपघात दिल्ली-जयपूर महामार्गावर झाला. येथे एका टँकरने पिकअप व्हॅन आणि कारला जोरदार धडक दिली, त्यामुळे कारने पेट घेतला आणि आत बसलेले चार जण जिवंत जळाले. या अपघातात पिकअप व्हॅनच्या चालकाचाही मृत्यू झाला आहे. पोलिस सध्या अपघातात ठार झालेल्यांची ओळख पटवत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दिल्ली जयपूर महामार्गावरील सिद्धरावली गावाजवळ जयपूरकडून एक हायस्पीड ऑइल टँकर येत होता. टँकरने आधी दुभाजक तोडले आणि नंतर दिल्लीहून जयपूरला जाणा-या लाईनमध्ये घुसला. येथे त्याने समोरून येणा-या डॅटसन गो कारला धडक दिली. या कारमध्ये सीएनजी लावण्यात आल्याने स्फोट होऊन कारला आग लागली. कारचे दरवाजे लॉक असल्याने ते उघडता न आल्याने आत बसलेल्या चार जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. कारला धडक दिल्यानंतर टँकर चालकाने समोरील डिव्हायडरचे ग्रील तोडले आणि दिल्लीहून जयपूरकडे जाणा-या सर्व्हिस लेनवर पोहोचला, तेथे त्याने समोरून येणा-या पिकअप व्हॅनला लक्ष्य केले. पिकअप व्हॅनच्या धडकेत पिकअप चालकाचाही मृत्यू झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR