27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्र१५ नोव्हेंबरपासून मनोज जरांगेंची तोफ पुन्हा धडाडणार

१५ नोव्हेंबरपासून मनोज जरांगेंची तोफ पुन्हा धडाडणार

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी सरकारला २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिल्यानंतर, मनोज जरांगे तिस-या टप्प्यात पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. या दौ-याला १५ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगेंनी आपल्या तिस-या टप्प्यातील महाराष्ट्र दौ-याचा वेळापत्रक जाहीर केला आहे.

विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात त्यांनी सरकारवर गंभीर आरोप आणि टीका केल्या होत्या. त्यामुळे तिस-या टप्प्यात महाराष्ट्र दौरा करताना जरांगे हे आपल्या सभांमधून काय बोलणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

मनोज जरांगे हे १५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर असा राज्याचा दौरा करणार आहे. या दौ-यात ते गावागावांत सभा घेणार आहेत. एकूण ६ टप्प्यांत हा दौरा असणार आहे. या दौ-यात जरांगे हे ठाणे, पालघर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, नेवासा, संगमनेर आणि श्रीरामपूर यासह अनेक ठिकाणी भेट देणार आहेत. सोबतच १ डिसेंबरपासून राज्यातील गावागावांत साखळी उपोषण केले जाणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR