पुर्णा : मौलाना आझाद महामंडळासाठी प्रथमच तब्बल ५०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील अल्पसंख्याक वर्गातील नागरिकांचे विविध प्रश्न सुटणार आहेत. या निधीसाठी शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी वेळोवेळी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. दरम्यान निधी मंजूर केल्याबद्दल सईद खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे आभार व्यक्त केले आहेत. तर अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी कुरेशी यांनी बैठक घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.
अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळून देण्यासाठी अल्पसंख्याक सेलचे प्रदेश अध्यक्ष सइद खान यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे निधी संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला. या पाठपुरावामुळे मौलाना आजाद विकास महामंडळासाठी तब्बल ५०० कोटी रूपये निधी मंजूर केल्यामुळे प्रदेश अध्यक्ष सईद खान यांच्या पाठपुराव्यास यश मिळाले आहे. मिळालेला निधी सर्व अल्पसंख्याक बांधवांसाठी महत्त्वाचा असून यामध्ये विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी कर्ज उपलब्ध होणार आहे. व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात मौलाना आजाद विकास महामंडळाच्या निधीची तरतूद केली असल्यामुळे आगामी काळात सर्वांना व्यवसायाच्या संधी निर्माण होणार आहेत.
पुर्णा शहर तथा तालुक्यातील सर्व युवकांनी, विद्यार्थ्यांनी मौलाना आझाद विकास महामंडळामध्ये येणा-या सर्व योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी उपनगराध्यक्ष तथा अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी कुरेशी यांनी केले आहे. यावेळी नगरसेवक अमजद नुरी, हिरा गवळी, शामसुंदर गायकवाड, मिलिंद सोनकांबळे, संजय शिदे, सरपंच रमेश सुर्यवंशी, पवन मोहीते महागावकर, मतीन हशमी, प्रकाश जमदाढें, मगदूम कुरेशी, मुजीब पठाण, सोहेल पठाण, शेशिकांत जगताप, गणी कुरेशी, उत्तम अहिरे, अल्ताफ भाई, अखतर कुरेशी, जानी पठाण, बबलू पठाण, महेमुद तांबोळी यांच्यासह कार्यकर्ते बैठकीत उपस्थित होते.