32.6 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeपरभणी५० किलो शेतमालामागे ४०० ग्रॅम कडता

५० किलो शेतमालामागे ४०० ग्रॅम कडता

बोरी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतक-यांनी विक्रीस आणलेल्या शेतमालास ५० किलोमागे ८०० ग्राम कडता घेण्यात येता होता. परंतू या विरोधात शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांनी कृउबा सभापतींना निवेदन देत अधिकचा कडता घेणे बंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार बाजार समितीने शेतकरी संघटना व व्यापा-यांची बैठक बोलावून या प्रश्नावर मार्ग काढला असून प्लॅस्टीक पोते असल्यास ४०० ग्रॅम तर सुतळी पोते असल्यास ८०० ग्रॅम कडता घेण्याचे बैठकीत ठरले आहे. त्यामुळे शेतक-यांत समाधान व्यक्त होताना दिसून येत आहे.

बोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापा-यांकडून ५० किलो शेतमाला मागे ८०० ग्राम कडता घेतल्या जात असून शेतक-यांची होणारी लूट थांबवावी यासाठी दि.१ डिसेंबर रोजी शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व सचिव यांना निवेदन देण्यात आले होते. त्या अनुषंगाने दि.२ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कृउबा सभापती आत्माराम पवार, सचिव रोडे यांनी व्यापारी आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक बोलावून या बैठकीमध्ये कडता प्रश्नावर चर्चा करण्यात आली. बैठकीत व्यापा-यांनी ५० किलो शेतमाला मागे ६०० ग्राम सुतळी थैलीचे वजनआणि २०० ग्राम हवा, माती असे मिळून ८०० ग्राम कडता घेतला जात असल्याचे सांगितले.

परंतु संघटनेने प्लॅस्टीक थैलीचे वजन १०० ग्राम ते जास्तीत जास्त १७० ग्राम व १०० ग्राम हवा, माती असे मिळून ३०० ग्राम. कडता घेणे अपेक्षीत असताना व्यापारी ८०० ग्राम कडता घेवून व्यापारी हे नियमापेक्षा ५०० ग्राम जास्त कडता घेत असल्याचे सांगितले. त्या अनुषंगाने बैठकीत प्रशासन, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ५० किलो वजनामागे लास्टिकची थैली असेल तर ४०० ग्राम आणि सुतळीची असेल तर ८०० ग्राम कडता घेण्यात येईल असे सर्वानुमते ठरले.

या बैठकीस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आत्माराम पवार, सचिव रोडे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संतोष चौधरी, संचालक अनंत देशमुख, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, माधव खरात, हनुमान आमले, दत्तराव बुलबुले, सय्यद कलीम भाई, अकबर बेग, दगडूबा वजीर, भाऊसाहेब हारकळ, शरद देशमुख, गंगाधर देशमुख, राजेभाऊ गोरे, शेख रहीम, उद्धव डोंबे यांच्यासह व्यापारी, शेतकरी, मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR