पुणे : ऐन दिवाळीत पुण्यात गाड्या पेटवल्याची घटना घडली आहे. पुण्यातील वारजे भागात असणा-या रामनगर टाकी चौक परीसरात रस्त्यावर पार्किंग केलेल्या दुचाकी अज्ञातांनी पेटविल्याची धक्कादायक समोर आली आहे. यात गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रस्त्याच्या बाजूला असलेल्या तीन दुचाकी पेटवण्यात आल्या तर एका चारचाकी वाहनाची काच फोडून नुकसान केले आहे. सध्या पुण्यात गाड्या पेटवणारी टोळी सक्रिय झाल्याचे मागील काही घटनांमधून समोर आले आहे.
दुचाकीच्या लागलेल्या आगीने शेजारील एका रिक्षाचे देखील काही प्रमाणात नुकसान झाले. ही घटना गुरूवारी मध्यरात्री पावणेदोन वाजेच्या सुमारास घडली.मिसळलेल्या माहितीनुसार, दुचाकी वरून आलेल्या २ व्यक्तींनी हा प्रकार केला असावा अशी शक्यता नागरिकांकडून वर्तविली आहे. या घटनेवर योग्य कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात अली असून वारजे पोलीस तपास करत आहेत.