21.3 C
Latur
Tuesday, September 17, 2024
Homeमहाराष्ट्रपडळकरांनी मुख्यमंत्री शिंदेंना करून दिली राजधर्माची आठवण

पडळकरांनी मुख्यमंत्री शिंदेंना करून दिली राजधर्माची आठवण

धनगर आरक्षण मुद्दा पेटला

मुंबई: भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पहिल्यांदाच थेट आणि गंभीर इशारा दिला आहे. ‘तुम्हाला राजधर्माची आठवण करुन देण्याची वेळ माझ्यावर आली आहे. धनगर आरक्षणाचा मुद्दा निकालात काढावा. अन्यथा धनगर समाजाच्या संविधानिक प्रतिक्रियेला आणि आंदोलनाच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी’, असा रोखठोक इशारा पडळकरांनी दिला.

एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे, तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मंत्री छगन भुजबळांच्या नेतृत्त्वात ओबीसी नेते एकवटले आहेत. अशा परिस्थितीत गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्र्यांना थेट टार्गेट केले आहे.

पडळकर म्हणाले, माननीय एकनाथ शिंदे साहेब आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात. आपली ओळख संवेदनशील नेता अशी आहे. तरी, तुम्हाला राजधर्माची आठवण करुन देण्याची वेळ माझ्यावर आली आहे. आपण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यात सर्वांसाठी सर्वसमावेशक नेतृत्त्व करणार असल्याची प्रतिज्ञा होती. धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबाजवणीसाठी शासनाने ५० दिवस दिले होते. आज ही मुदत संपली आहे.

तरी या मुद्द्यावर शाकीय पातळ्यांवर काहीही ठोस हलचाल दिसत नाही. फक्त विशिष्ट समाजासाठी आपली वाट्टेल ते करायची तयारी आहे अशी धारणा बहुजन समाजाची आपल्याबद्दल होत आहे. आघाडी सरकारने आरक्षण नाकारुन धनगर जमातीवर अन्याय केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या महायुतीच्या सरकारचा नेतृत्त्वात धनगर आरक्षण अंमलबाजवणी होईल , ही आशा सामान्य धनगरांना आहे. मात्र, त्यांच्याकडूनही निराशा पदरी पडत आहे. धनगर समाजाच्या उद्धारासाठी सुरु असलेल्या योजना बंद आहेत. त्या आमच्या आठही मागण्यांची अंमलबाजवणीची तात्काळ गरज आहे.

समित्या गठित करून धनगर समाजाच्या पदरात यातून काहीही पडणार नाही. ही भावना सामान्य धनगरांच्या मनात निर्माण होते आहे.आपण वेळीत योग्य पावले उचलावीत. धनगर आरक्षणाचा मुद्दा निकालात काढावा.

अन्यथा धगनर समाजाच्या संविधानिक प्रतिक्रियेला आणि आंदोलनाच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. हा इशारा राज्यातील तमाम ५ कोटी धनगर समाजाच्यावतीने मी तुम्हाला देतो आहे, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR