कोलकाता : मागील वर्षी कोलकाता येथील आरजी कर मेडिक कॉलेजमध्ये एका तरुणीवर अत्याचाराची घटना घडली होती. या प्रकरणाला वर्ष उलटले असून आता आणखी एक अशीच घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला. कोलकाता येथील लॉ कॉलेजमधील एका तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याचे समोर आले.
शहरातील एका लॉ कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला. या घटनेप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींमध्ये एक माजी विद्यार्थी आणि त्याच संस्थेतील दोन कर्मचारी आहेत. सध्या पोलिस आरोपींची चौकशी करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जून रोजी रात्री १० ते १०.५० वाजेपर्यंत आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या काळात पीडिता दयेची याचना करत राहिली. पण आरोपींनी तिच्यावर अत्याचार केले.
२६ जून रोजी आरोपीला अटक
पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केली. २६ जून रोजी आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी तिन्ही आरोपींचे मोबाईल फोनही जप्त केले आहेत आणि तिघांनाही न्यायालयात हजर करण्याची तयारी सुरू आहे. पोलिसांनी आरोपींच्या कुटुंबियांनाही बोलावून घटनेबद्दल विचारपूस केली आहे असे एका अधिका-याने सांगितले.