18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयमहादेव अ‍ॅप प्रकरणी १८ आरोपींवर गँगस्टर अ‍ॅक्ट; पोलिसांची मोठी कारवाई

महादेव अ‍ॅप प्रकरणी १८ आरोपींवर गँगस्टर अ‍ॅक्ट; पोलिसांची मोठी कारवाई

लखनौ : महादेव अ‍ॅप प्रकरणी उत्तर प्रदेशच्या नोएडा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. महादेव ऍपच्या १८ आरोपींविरुद्ध गँगस्टर ऍक्ट लावण्यात आला आहे. महादेव अ‍ॅपशी संबंधित लोकांना २०२२ मध्ये नोएडामधील एका पॉश सोसायटीमधून अटक करण्यात आली आहे. नोएडा पोलिसांनीही या अ‍ॅपवर बंदी घालण्यासाठी पत्र लिहिले होते. या प्रकरणी नोएडातील पोलीस स्टेशन ३९ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले आरोपी उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड या विविध राज्यातील रहिवासी आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपपत्रही दाखल केले आहे.

महादेव अ‍ॅप प्रकरणावरून जोरदार राजकारण सुरू आहे. याप्रकरणी भाजप छत्तीगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना कोंडीत पकडत आहे. दुसरीकडे महादेव अ‍ॅप प्रकरणी मुंबई पोलिसांनीही काही लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. सुमारे १५ हजार कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी मुंबई पोलिसांनी ‘महादेव’ बेटिंग अ‍ॅपच्या ‘प्रमोटर’सह ३२ जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

माटुंगा पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘अ‍ॅप प्रवर्तक सौरभ चंद्राकर’, मुख्य आरोपी रवी उप्पल, शुभम सोनी आणि इतरांविरुद्ध २०१९ पासून आतापर्यंत फसवणूक केल्याबद्दल मंगळवारी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या विनंतीवरून ५ नोव्हेंबर रोजी केंद्राने महादेव अ‍ॅप आणि ‘रेड्ड्यानाप्रिस्टोप्रो’सह २२ बेकायदेशीर सट्टेबाजी प्लॅटफॉर्म ब्लॉक करण्याचे निर्देश दिले, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR