38.7 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeराष्ट्रीयमुख्यमंत्र्यांनी सत्तेत बसून सट्टेबाजीचा खेळ खेळला

मुख्यमंत्र्यांनी सत्तेत बसून सट्टेबाजीचा खेळ खेळला

नवी दिल्ली : महादेव बेटिंग अ‍ॅपमधून छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना ५०८ कोटी रुपये मिळाल्याचा खळबळजनक आरोप भाजपने केला आहे. सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) कारवाईच्या आधारे भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आज हा आरोप केला. तसेच भूपेश बघेल सत्तेत राहून ‘सट्टेबाजीचा खेळ’ खेळत असल्याची तोफ डागली. काँग्रेस पक्ष छत्तीसगड मध्ये निवडणूक प्रचारात सट्टेबाजांनी हवालातून आणलेल्या पैशाचा वापर करत असल्याचा दावाही स्मृती इराणी यांनी केला.

छत्तीसगढमध्ये निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला असताना महादेव बेटिंग अ‍ॅपमध्ये प्रकरणात मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे नाव समोर आल्यामुळे भाजपला काँग्रेसविरुद्ध मोठा मुद्दा मिळाला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आज भाजप मुख्यालयामध्ये पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. ईडीची चौकशी छत्तीसगड तसेच आंध्र प्रदेशातील पोलिसांच्या निष्कर्षांवर आधारित असून निवडणुकीच्या इतिहासात असे पुरावे समोर येण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री बघेल लोकांच्या पाठिंब्याऐवजी हवाला आणि सट्टेबाजी करणा-यांच्या मदतीने निवडणूक लढवत आहेत, असा आरोप स्मृती इराणी यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR