23.9 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeक्रीडाकोहलीला कर्णधार पदावरून मी हटवले नाही

कोहलीला कर्णधार पदावरून मी हटवले नाही

नवी दिल्ली : काही वर्षांपूर्वी सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्यातील वादाची बरीच चर्चा झाली होती. विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्यावरून हा वाद झाला होता, त्यानंतर विराट कोहलीने सर्व फॉरमॅटमधून कर्णधारपद सोडले. आता सौरव गांगुलीने विराटला कर्णधारपदावरून मी हटवले नाही असा खुलासा केला आहे.

सध्या विराट कोहली टीम इंडियाच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. महेंद्रसिंग धोनीनंतर विराट कोहलीने दीर्घकाळ क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले, पण त्याला एकदाही आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही.
आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२१ सुरू होण्यापूर्वीच विराट कोहलीने घोषणा केली होती की या स्पर्धेनंतर तो टी-२० फॉरमॅटमध्ये टीम इंडियाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देईल. विराटच्या नेतृत्वाखालील त्या शेवटच्या आयसीसी स्पर्धेतही टीम इंडियाचा पराभव झाला होता.

त्यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली होते. गांगुलीने विराटशी चर्चा केली होती, त्यानंतर विराटने सर्व फॉरमॅटमधून कर्णधारपद सोडले आणि गांगुलीसोबतच्या त्याच्या वादाच्या बातम्या मीडियामध्ये चर्चेत आल्या.

सौरव गांगुली म्हणाला, मी विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवले नाही. तर मी त्याला सांगितले की, जर तुला टी-२० मध्ये संघाचे नेतृत्व करायचे नसेल, तर तु संपूर्ण पांढ-या चेंडूच्या क्रिकेटमधून कर्णधारपद सोडले, तर चांगले होईल. मात्र, एकदिवसीय क्रिकेटच्या कर्णधारपदाबाबत विराट कोहलीने म्हटले होते की, वनडे क्रिकेटचे कर्णधारपद सोडण्याबाबत त्याच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही. त्यानंतर विराटने कसोटीचे कर्णधारपदही सोडले आणि त्यानंतर रोहित शर्माला तिन्ही फॉरमॅटचे कर्णधार बनवण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR