जळगाव : गेले काही दिवस अनेकांच्या ताटातून लसूण गायब झाला होता. लसणाचे दर इतके वाढले की बहुतेकांनी लसूण घेणेच बंद केले. काहींनी लसूण वापरणे कमी केले. कित्येक दिवस रडवणा-या लसणाचे दर आता अखेर घसरले आहेत.
लसूण आता स्वस्त झाला आहे. बाजारात नवीन लसणाची आवक वाढल्याने लसणाचे दर कमी झाले आहेत. जळगावच्या भुसावळमध्ये सर्वाधिक लसूण आवक मध्य प्रदेशातून होते. मात्र तिथेही लसूण लागवड कमी झाली आहे. नवरात्रीच्या काळात अर्थात सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात लागवड झालेल्या लसणाची काढणी कमी प्रमाणात होत आहे. उत्पन्नाच्या तुलनेत केवळ १० ते १५ टक्के काढणी झाली आहे. यामुळे दरात तेजी कायम असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
सुरुवातीला जो लसणाचा भाव वाढला जो किलोमागे १०० रुपयांवर गेला, मग हळूहळू ही किंमत ४०० वर पोहोचली आहे. दरम्यान, येत्या काळात नवे उत्पादन आल्याने हा भाव हळूहळू घसरेल, असे व्यापा-यांचे मत आहे.
आता मात्र कमी प्रमाणात का होईना नवीन ओला लसूण बाजारात आला आहे. यामुळे दरात घसरण झाली आहे. बाजारामध्ये नवीन लसणाची आवक वाढली आहे. मध्य प्रदेशातून नवीन लसूण बाजारात येण्याचे प्रमाण काही अंशी वाढले आहे. यामुळे लसणाच्या दरात प्रतिकिलो १०० ते १४० रुपये किलोने घसरण झाली आहे.