27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeक्रीडागिलच्या नवीन इनिंगची सुरवात; गुजरात टायटन्सचा कर्णधार

गिलच्या नवीन इनिंगची सुरवात; गुजरात टायटन्सचा कर्णधार

नवी दिल्ली : आतापर्यंत गुजरात टायटन्सचा कर्णधार असलेला हार्दिक पांड्या आता पुन्हा मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. अशा परिस्थितीत लोकांना प्रश्न प्रश्न पडला होता की, आता गुजरात टायटन्सचा कर्णधार कोण होणार? पण गुजरात टायटन्सने लवकरच लोकांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. शुभमन गिलच्या नवीन इनिंगची सुरवात झाली आहे. गुजरात टायटन्सने सोमवारी शुभमन गिल गुजरात टायटन्सचा नवा कर्णधार असेल अशी घोषणा केली आहे. गुजरात टायटन्सने त्यांच्या सोशल मीडिया साइट ‘एक्स’च्या हँडलवर केलेल्या पोस्टमध्ये शुभमन गिलचे अभिनंदन करताना लिहिले की, या नवीन मोसमात सर्वोत्तम ठरल्याबद्दल तुमचे अभिनंदन.

गुजरात टायटन्सने लिहिले की, कर्णधार शुभमन गिल पुढील मोसमात संयमाने आणि उत्साहाने टायटन्सचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. तत्पूर्वी, रविवारी सर्व १० आयपीएल संघांनी ‘रिटेन’ आणि ‘रिलीझ’ खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, गुजरात टायटन्सने यापूर्वी जाहीर केले होते की, पंड्या या हंगामातही त्यांच्याकडून खेळेल. तसेच नीता अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी यानेही हार्दिकच्या पुनरागमनावर आनंद व्यक्त केला आहे.

मुंबई इंडियन्सच्या हँडलवरून जारी केलेल्या निवेदनात आकाश अंबानी म्हणाले की, “हार्दिकला मुंबई इंडियन्समध्ये परतताना पाहून मला खूप आनंद झाला. घरवापसीच्या शुभेच्छा!” आकाश अंबानी म्हणाले, “तो ज्या संघात खेळतो त्याला ताकद देतो.” मुंबई इंडियन्सच्या कुटुंबासोबत हार्दिकची पहिली इनिंग खूप यशस्वी ठरली आणि आम्हाला आशा आहे की या दुसऱ्या डावात त्याला आणखी यश मिळेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR